आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Good Roads Lead To More Accidents Claim Bjp Mp Lochan Das From Assam, News And Updates

काय करायचे चांगले रस्ते, चांगल्या रस्त्यांमुळे अपघात होतात! आसामच्या भाजप खासदाराचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेझपूर (आसाम) - एखादी गोष्ट नेमकी चांगली की वाइट हा ज्याच्या-त्याच्या दृष्टीकोनाचा भाग असतो. परंतु, आसामच्या एका भाजप खासदाराचे विधान सध्या चर्चेत आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत चर्चेत असलेल्या मूलभूत गरजांपैकी एक आहे रस्ता... काश्मीर असो की कन्याकुमारी, रस्त्यांची समस्या एकच... लोक नेहमीच प्रशासन आणि सरकारला खड्डे आणि कच्च्या रस्त्यांवरून दोष देतात. परंतु, या भाजप खासदाराच्या मते खड्डेमय रस्तेच चांगले आहेत. रस्ते चांगले असल्यास अपघात होतात.

खड्डेमय रस्तेच बरे

आसामात भाजपचे खासदार असलेले पल्लब लोचन दास तेझपूर येथे गुरुवारी एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी लोकांनी त्यांच्यासमोर रस्त्यांचे प्रश्न मांडले. रस्त्यांमुळे त्यांना किती समस्यांना सामोरे जावे लागतो, रोज किती त्रास होतो याचे गाऱ्हाणे मांडले. परंतु, सर्वच ऐकून घेतल्यानंतर या खासदारांनी दिलेले उत्तर धक्कादायक होते. ते म्हणाले, "चांगले रस्ते तयार करण्यात काहीच अर्थ नाही. कशा करायचे चांगले रस्ते? खराब रस्त्यांमुळे अपघात कमी होतात."

चांगल्या रस्त्याने कुणाचे भले झाले नाही

खराब रस्त्यांचे फायदे अधिक चांगल्याप्रकारे समजावून सांगण्यासाठी खासदार महोदयांनी एक सिद्धांत देखील मांडला. पल्लब लोचन दास यांच्या मते, गाडी हळू चालवण्यास अपघातही कमी होतात. आणि रस्त्यांवर खड्डे किंवा खराब रस्ते असल्यास युवकांना गाडी नेहमीच हळू चालवावी लागते. त्यांना वेगाने जाताच येत नाही. अशात आपो-आप अपघाताचे प्रमाण कमी होते. लोचन दास एवढ्यातच थांबले नाहीत. मुळात भाजप सरकारने देशभर विविध ठिकाणी चांगले रस्ते बांधण्यात यश मिळवले आहे. परंतु, या चांगल्या रस्त्यांमुळे केवळ अपघातांमध्ये वाढ झाली असे ज्ञान त्यांनी आपल्या जनतेला दिले.

बातम्या आणखी आहेत...