आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत सुरु होता 'गुड टच, बॅड टच' कार्यक्रम..समोर आले नराधम बाप, भाऊ आणि चुलत्याचे घृणास्पद कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये पोलिसांच्या मदतीने विविध सामाजिक संस्था 'गुड टच, बॅड टच' बाबत जनजागृतीपर कार्यक्रमातून मुलींना समज देत आहेत. अशाच एका कार्यक्रमातून नराधम चुलत्यासह बाप आणि भावाचे घृणास्पद कृत्य समोर आले आहे.

 

एका मुलीवर बापासह चुलत्याने आपल्या लेकीवर तर भावाने आपल्या बहिणीवर लैंकिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजीनगरात ही घटना घडली आहे. या घटनेची गंभीर दखल घेवून पोलिसांनी नराधमांना अटक केली आहे.

 

काय आहे हे प्रकरण?
पोलिसांच्या मदतीने काही सामाजिक संस्थांनी शिवाजी नगर भागातील रफिकनगर येथील एका उर्दू शाळेत 25 डिसेंबरला 'गुड टच, बॅड टच' जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलिस दीदी आणि समन्वयक मुलींना शारीरिक बदल आणि समाजात वावरताना असामाजि तत्त्व नकळत आपल्यावर कशाप्रकारे अत्याचार करतात, याबाबत मार्गदर्शन करत होते. यादरम्यान एक 13 वर्षीय मुलीला रडू कोसळले. पोलिस दीदीने तिला विश्वासात घेऊन विचारले असता, वडील, चुलता आणि भाऊ तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे तिने सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी पीडिती मुलीचे वडिलांना अटक केली असून तिचा चुलता फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तसेच बहिणीचे लैंगिक शोषण करणार्‍या 16 वर्षीय भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...