Home | Jeevan Mantra | Dharm | Good Works According To Mythology

विष्णू पूजा, एकादशी व्रतसहित हे 6 शुभ काम करत राहिल्यास, घरात प्रवेश करत नाही गरिबी

रिलिजन डेस्क | Update - Aug 22, 2018, 11:09 AM IST

आज (बुधवार, 22 ऑगस्ट) श्रावण मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या दिवशी महादेव तसेच भगवान विष्णूंची पूजा केली जाते

 • Good Works According To Mythology

  आज (बुधवार, 22 ऑगस्ट) श्रावण मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या दिवशी महादेव तसेच भगवान विष्णूंची पूजा केली जाते. सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी शास्त्रामध्ये विविध नियम आणि परंपरा-प्रथा सांगण्यात आल्या आहेत. या प्रथांचे पालन केल्यास आपल्याला पुण्य तसेच धन-संपत्ती प्राप्त होते. भाग्याशी संबंधित बाध दूर होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शास्त्रामध्ये एक श्लोक सांगण्यात आला आहे. यामध्ये भाग्य बदलणारे 6 काम सांगण्यात आले आहेत. या कामामुळे घरामध्ये गरिबी प्रवेश करू शकत नाही आणि सुख-समृद्धी कायम राहते.

  श्लोक
  विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव:।
  असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी।।

  या श्लोकामध्ये सांगण्यात आलेले सहा काम करत राहिल्यास सर्वप्रकाराच्या बाधा दूर होऊ शकतात. या 6 कामामध्ये पहिले काम भगवान विष्णूंची पूजा करणे हे आहे. भगवान विष्णू परमात्म्याच्या तीन स्वरूपामधील एक आहेत. श्रीहरी ऐश्वर्य, सुख-समृद्धी आणि शांतीचे स्वामी आहेत. विष्णू अवतारांची पूजा केल्यास धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्त होऊ शकतो.


  एकादशी व्रत -
  हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशी व्रत संयम,नियम, व्रत-उपवासच्या माध्यमातून धर्म आणि शिस्तीशी जोडून पुण्य तर देतेच त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टीनेही हे व्रत नैसर्गिक तत्वांसोबत शरीराचा ताळमेळ साधून स्वस्थ आणि दीर्घायुष्य प्रदान करणारे आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्यास घरात स्थिर लक्ष्मी राहते.


  गाय -
  गायीची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानण्यात आले आहे. धर्म शास्त्रामध्ये गायीला देव रूप मानले गेले आहे. अनेक देवी-देवतांचा वास गायीमध्ये मानला जातो. याच कारणामुळे गायीचा प्रत्येक अंश दुध, दही, तूप एवढेच नाही तर गोमुत्र, शेण देव कर्मासाठी पवित्र आणि मंगलकारी मानण्यात आले आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही या सर्व गोष्टी शरीरासाठी रोगनाशक आहेत. दररोज गायीला पोळी, भाकरी खाऊ घातल्यास घरामध्ये सुख-शांती, धनसंपदा कायम राहते.


  गीता -
  धार्मिक दृष्टीकोनातून गीता ईश्वराचे साक्षात ज्ञानस्वरूप आहे. यामुळे कोणत्याही स्वरुपात गीता पाठ, स्मरण करणे शरीर आणि आत्म्यासाठी सुख आणि मोक्षदायी आहे. सर्व वेद, उपनिषदांचा सार गीतेला मानण्यात आले आहे. जे लोक दररोज घरात गीतेचे पाठ करून श्रीकृष्णाची पूजा करतात त्यांच्या घरात स्थिर लक्ष्मीचा वास राहतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन कामे...

 • Good Works According To Mythology

  तुळस
  हिंदू पौराणिक मान्यतेनुसार घरात दररोज तुळशीची पूजा केल्याने आणि दिवा लावल्याने सुख,शांती कायम राहण्यास मदत होते. घरात तुळशी-शालिग्राम विवाह वर्षातुन एकदा केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. तुळस रोगनाशक आहे.

 • Good Works According To Mythology
  ब्राह्मण -
  धर्म ग्रंथांमध्ये ब्रह्म किंवा परमेश्वराचा अंश ब्राह्मणामध्ये असल्याचे मानले गेले आहे. यामुळे ब्राह्मणांना परमेश्वराचे साक्षात रूप मानून त्यांची पूजा, सेवा करून त्यांना दक्षिणा देण्याची प्रथा आहे. त्यांच्या आशीर्वादाने सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते असे मानले गेले आहे.

Trending