आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही-टायर-सिनेमा तिकिटावरील टॅक्स स्लॅब कमी, सिमेंट-ऑटो पार्ट्समध्ये काहीही बदल नाही : जेटली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, 28% टॅक्स स्लॅबमध्ये आता केवळ 28 वस्तू आहेत. हे सर्व लक्झरी आयटम्स आहेत. त्यांनी सांगितले की टीव्ही, टायर, मोबाइल बॅटरी, व्हिडिओ गेम 28% टॅक्स स्लैबमधून 18% टॅक्स स्लॅबमध्ये आणले आहे. विमानाने तीर्थयात्रा करण्यासाठी आधी 18% टॅक्स लागायचा आता हा सर्वसाधारण टॅक्सप्रमाणे म्हणजे इकोनॉमीसाठी 5% आणि बिझनेस क्लाससाठी 12% असेल. 

 
जीएसटी काऊंसिलचे निर्णय 
>> 100 रुपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटांना 18% ऐवजी 12% स्लॅबमध्ये आणले आहे. 100 पेक्षा अधिकची तिकिटे 28% मधून 18% स्लॅबमध्ये आणली आहेत. 
>> सीमेंट आणि अॅटो पार्ट्सवर जीएसटीच्या दरांमध्ये काहीही कपात करण्यात आलेली नाही. 
>> बैंकांकडून जन-धन खातेधारकांना दिल्या जाणाऱ्या सेवा जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेल्या आहेत. 
>> 28% टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या 6 वस्तूंचे कर कमी केले आहे. 
>> रियल इस्टेट सेक्टरमधील जीएसटीबाबतचा निर्णय परिषदेच्या पुढच्या बैठकीत घेतला जाईल. सर्वांच्या मते या क्षेत्रातही बदल होणे गरजेचे आहे. 
>> एसी, डिशवॉशरवर 28% जीएसटी लागेल. 
>> थर्ड पार्टी इंश्युरन्स प्रीमियमवर जीएसटी 18% वरून 12% केला आहे. 
 

दीड वर्षात 199 वस्तू 28% टॅक्स स्लॅबच्या बाहेर 
1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू झाला तर 28% टॅक्स स्लॅबमध्ये 226 वस्तू होत्या. दीड वर्षात यापैकी 199 वस्तुंवर टॅक्स कमी करण्यात आला आहे. सद्या 28% जीएसटी स्लॅबमध्ये 28 वस्तु आहेत. त्यामध्ये सिमेंटशिवाय वाहने, अॅटोमोबाइल पार्ट्स, यॉट, एअरक्राफ्ट, कोल्ड ड्रिंक्स, तंबाखू, सिगारेट आणि पान मसाला अशा वस्तुंचा समावेश आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...