आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील सरकारच्या आदेशानंतर गुगलची हुवावेच्या स्मार्टफोनवर बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - चिनी कंपनी हुवावेच्या नव्या स्मार्टफोनवर आता गुगलच्या अॅपचे अॅक्सेस मिळणार नाहीत. त्याचबरोबर जे ग्राहक हुवावेचे जुने फोन वापरत आहेत, त्यांना अँड्रॉइड ओएस अपडेट मिळणार नाही.
परवाना घेतल्याशिवाय अमेरिकेतील कंपनीसोबत व्यवहार करता येत नसल्याच्या यादीत अलीकडेच अमेरिकी सरकारने हुवावेचा समावेश केला होता. याच आधारावर गुगलने हुवावेला डिव्हाइसचे अपडेट न देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सरकारच्या आदेशाचे पालन करत असून यासंबंधी सर्व पैलूंवर लक्ष ठेवून असल्याचे गुगलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आता हुवावेच्या ग्राहकांना गुगल सिक्युरिटी अपडेट आणि तांत्रिक सहकार्य मिळणार नाही. त्यामुळेच आता नवीन स्मार्टफोनवर यूट्यूब आणि गुगल मॅप उपलब्ध नसतील. सध्याच्या हुवावे युजरला गुगल प्ले सेवेला अपडेट करण्याबरोबरच सिक्युरिटी फिक्स आणि अॅप्स अपडेट करता येईल. गुगलने अँड्राॅइडचे नवीन व्हर्जन लाँच केले तर ते हुवावेच्या स्मार्टफोनवर मिळणार नाही. वास्तविक, हुवावे ओपन सोर्स परवान्यातून मिळणाऱ्या व्हर्जनचा वापर करू शकेल.

 

इतर कंपन्यांचीही सर्व प्रकारच्या व्यवहारावर बंदी 
 गुगलव्यतिरिक्त काही अमेरिकी कंपन्यांनीही हुवावेसोबतच्या व्यवसायावर बंदी घातली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार जगातील तिसरी सर्वात मोठी चिप डिझायनर आणि पुरवठादार कंपनी इंटेल, क्वालकॉम आणि ब्रॉडकॉनने हुवावेसोबतच्या सर्व प्रकारचे व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटेल हुवावेला सर्व्हर चिप आणि लॅपटॉपसाठी प्रोसेसर देते, तर क्वालकॉमकडून हुवावेला माॅडेलसह इतर प्रोसेसर उपलब्ध करून दिले जातात.

बातम्या आणखी आहेत...