आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Google CEO Sundar Pichai Hires As CEO For Parent Company Alphabet, Google's Ad Revenue Up 74% In 3 Years

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची पॅरेंट कंपनी अल्फाबेटच्या सीईओपदी नियुक्ती, गूगलचा अॅड रेव्हेन्यू 3 वर्षात 74% वाढला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2015 मध्ये गूगलचा अॅड रेव्हेन्यू 67 अब्ज डॉलर होता, 2018 मध्ये 116 अब्जाबर पोहचवला
  • पॅरेंट कंपनी अल्फाबेटचा रेव्हेन्यू 2018 मध्ये 136 अब्ज डॉलर होता, यात गूगल अॅडचे 85% शेअर
  • पिचाईने 2004 मध्ये गूगल जॉइन केली, 2015 मध्ये सीईओ बनले; 4 वर्षानंतर अल्फाबेटचेही सीईओ
  • चेन्नईमध्ये जन्म झालेल्या पिचाई यांना अमेरिकेत पाठवण्यासाठी वडिलांना कर्ज घ्यावे लागले होते

बिझनेस डेस्क- आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या गूगलचे सीईओ सुंदर पिचाई(47) गूगलचे सीईओ झाल्याच्या फक्त 4 वर्षानंतर गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटही सीईओ बनले आहेत. पिचाईंच्या नेतृत्वात गूगलचा वार्षिक अॅड रेव्हेन्यू मागील 3 वर्षात 74% टक्के वाढला. 2015 मध्ये 67.39 अब्ज होता, 2018 मध्ये 116.32 अब्ज डॉलरवर पोहचला. पिचाईच्या नेतृत्वात गूगल सर्व प्रमुख ट्रेंड जसे- क्लाउड, मोबाइल, सर्च आणि अॅडवरटाइजिंगमध्ये सर्वात पुढे आहे, नवीन तंत्रज्ञानावर खर्च करण्यावरही सर्वात पुढे. अल्फाबेटचे रेव्हेन्यूमध्ये गूगलच्या अॅड बिझनेसची 85% भागीदारी आहे. कंपनी मागील 15 तिमाहीपासून नफ्यात आहे. मागच्या वर्षी अल्फाबेटचे एकूण रेव्हेन्यू 136 अब्ज डॉलर होता. मागील 4 वर्षात कंपनीच्या शेअरने 80% पेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत.

पिचाई 2 वर्षांपूर्वी अल्फाबेटच्या बोर्डात सामील झाले, त्यांच्याकडे 0.1% शेअर
 
पिचाईने प्रायवसी, द्वेष पसरवणारे वक्तव्य, चुकीची माहिती आणि राजकीय भेदभावसारख्या वादांमधून कंपनीला बाहेर काढले. टाइग्रेस फायनांशिअल पार्टनर्सचे डायरेक्टर (रिसर्च) इवान फेनसेथचे म्हणने आहे की, ही आशा होतीच की, पिचाई यांना जास्त जबाबदाऱ्या दिल्या जातील. अल्फाबेटच्या नेतृत्वासाठी ते योग्य व्यक्ती आहेत.

मागील चार वर्षात गूगलचा अॅड रेव्हेन्यू

वर्ष            रेव्हेन्यू (रुपये)
20154.35 लाख कोटी
20165.55 लाख कोटी
20176.10 लाख कोटी
20188.31 लाख कोटी

मागील 15 वर्षात गूगलमध्ये पिचाईंचे नाव झपाट्याने वाढले. सुरुवातील गूगल टूलबार आणि गूगल क्रोम डेवलप करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. 2014 मध्ये त्यांना कंपनीचे सर्व प्रोडक्ट आणि प्लॅटफॉर्म्सच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळआली. पिचाई 2015 मध्ये गूगलचे सीईओ बनले आणि 2017 मध्ये पँरेंट कंपनी अल्फाबेटच्या बोर्ड ऑफ डीरेक्टर्समध्ये सामील झाले. त्यांच्याकडे कंपनीचे 0.1% शेअर आहेत. आता अल्फाबेटचे सीईओ बनल्यानंतर त्यांच्या पोर्टफोलियोमध्ये गूगलच्या कोर प्रोडक्ट्सशिवाय सेल्फ ड्राइविंग कार सब्सिडियरी वेयमोसारखे प्रोजेक्टदेखील सामील झाले आहेत.

गूगल    
 
21 वर्षांपूर्वी सर्च इंजिनम्हणून सुरुवात केली. कंपनी आता सॉफ्टवेअरपासून सेल्फ-ड्राइविंग कारदेखील बनवते. गूगल अल्फाबेटची सर्वात मोठी सब्सिडियरी आहे. याच्या पोर्टफोलियोमध्ये प्रमुख सर्च इंजिनमध्ये अॅप्स येतात. यात गूगल सर्च, गूगल मॅप्स, यूट्यूब आणि अॅडसेंस प्रमुख आहेत. अँड्रॉयड आणि याच्याशी निगडीत गूगल-पेसारख्या सर्व्हिसदेखील यात सामील आहेत. अल्फाबेटच्या 10 पैकी 9 कर्मचारी गूगलसाठी काम करतात.

अल्फाबेट


गूगलचे फाउंडर लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने 2015 मध्ये गूगलला रिस्ट्रक्चर करुन अल्फाबेट बनवली. गूगलचे शेअर अल्फाबेटमध्ये कन्वर्ट झाले. अमेरिकेच्या शेअर बाजाराच कंपनीचे नाव बदलून अल्फाबेट झाले. गूगल लाइफ सायंस, नेस्ट लॅब्स, गूगल फायबर, गूगल एक्स, गूगल वेंचर, गूगल कॅपिटल आणि वेयमोसारख्या कंपन्या अल्फाबेटच्या सब्सिडियरी आहेत. गूगल एक्सच्या प्रोजेक्ट्समध्ये विंग ड्रोन डिलीव्हरी सिस्टीम आणि सेल्फ ड्राइविंग कार आहेत.

मार्केट कॅपमध्ये अल्फाबेट जगातिल तिसरी कंपनी

कंपनी              मार्केट कॅप (रुपये)
अॅपल82.55 लाख कोटी
मायक्रोसॉफ्ट81.62 लाख कोटी
अल्फाबेट64 लाख कोटी
अमेझॉन62.88 लाख कोटी
फेसबुक40.63 लाख कोटी

कोर बिझनेसची ग्रोथ आणि रेग्युलेटरी वाद पिचाईंसाठी मोठे आव्हान
 
अल्फाबेटला सध्या वेयमो आणि वेरिलीसारख्या सब्सिडियरीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण गूगलच्या डिजीटल अॅडवरटाइजिंगसारख्या बिझनेसची ग्रोथ कमी झाली आहे. दुसरीकडे गूगलवर प्रतिस्पर्धी कंपन्यांना ऑनलाइन सर्चमध्ये ब्लॉक केल्याप्रकरणी दंडदेखील बसला आहे. प्रतिस्पर्धा नियमांच्या उल्लंघनप्रकरणी अनेक देशांनी रेग्युलेटर कंपनीला दोषी ठरवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गूगलवर राजकीय भेदभाव केल्याचा आरोप लावतात. कंपनीला मागील एका वर्षादरम्यान अनेकवेळा कर्मचाऱ्यांच्या रागाचाही सामना करावा लागला आहे. लैंगित शोषणाचा आरोपी अँडी रुबिनला 9 कोटी डॉलरचे एग्जिट पॅकेज देण्यावरुन गूगलच्या हजारो कर्मचाऱ्यांनी मागील वर्षी आंदोलन केले होते.
 

बातम्या आणखी आहेत...