interview / कितीही व्यग्र असा, कुटुंबासाठी पुरेसा वेळ देण्याचा गुण प्रत्येकाकडे असायला हवा : सुंदर पिचाई

गुगलचे सीईओ पिचाई यांच्या वाढदिवशी टेक गुरू सिद्धार्थ राजहंस यांची त्यांच्याशी बातचीत

विशेष प्रतिनिधी

Jul 12,2019 12:19:00 PM IST

कॅलिफोर्निया - गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आज ४७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. गेल्या १५ वर्षांत गुगलसोबत राहून सुंदर पिचाई यांनी जीवन व जगात खूप मोठे चढ-उतार पाहिले. ते म्हणतात, गुगलचा प्रत्येक प्रकल्प आणि सेवा देताना जगातील कोणत्या ना कोणत्या समस्येवर उपाय निघाला पाहिजे याची आम्ही काळजी आम्ही घेतो. सोबत, तुम्ही कितीही व्यग्र असा, आपल्या कुटुंबासाठी वेळ दिलाच पाहिजे. हा गुण प्रत्येक माणसात असायलाच हवा... पिचाई यांच्या वाढदिवसानिमित्त टेक गुरू सिद्धार्थ राजहंस यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत...

जगातील तीन मोठ्या बदलांपैकी तुम्ही कोणत्या बदलास गेम चेंजर मानता?
> ५-जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्सपैकी मी एआयच्या बाजूने आहे. ५-जी एक चांगला बदल आहे, मात्र तो तंत्रज्ञानाला एक पाऊल नेईल. परंतु, तंत्रज्ञानात नवी झेप ठरेल ते ‘एआय’. हा गेम चेंजरच आहे.


गुगल व जगासाठी एआयच्या योगदानाबाबत आपल्या मनातील एक विचार काय?
> मी २००४ मध्ये गुगलमध्ये आलो होतो. यात नवोन्मेष आणि व्यवस्थापनात मी अनेक वेगळे अनुभव घेतले. मला वाटते, गुगल ही जगातील एक अद्वितीय कंपनी ठरली आहे. आज गुगल हे इंटरनेटचा पर्याय आहे. आज आमचे लक्ष्य याच विचारप्रणालीस आणखी पुढे नेणे हा आहे.


गुगलमध्ये सीईओ म्हणून तुम्ही केलेले तीन मोठे बदल कोणते?
> एका परिपक्व लीडरला आपल्या कंपनीतील प्रत्येक गोष्टीस जबाबदार असले पाहिजे. सोबत सर्वांची भागीदारी हवी. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली पाहिजे. तिसरे म्हणजे, कंपनीला अल्फाबेटच्या बॅनरखाली संघटित करणे. म्हणजेच या मूलतत्त्वांवर लक्ष देणे होय. ही तिन्ही तत्त्वे कंपनीला प्रगतिपथावर नेऊ शकतात.


मोदी पुन्हा सत्तेत आले, भारतीयांना अधिक नोकऱ्या देण्याबाबत विशेष योजना आहे?
> नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. सहसा मी राजकीय भाष्य करत नाही. आम्ही भारतात व्याप्ती वाढवत आहोत. आमच्या पोर्टफोलिओत आता नवे रोजगारही जोडले जात आहेत. आम्ही भारतीयांना यात संधी देणे सुरू ठेवू... मला वाटते, आमच्यासाठी गुगलर्स फार महत्त्वाचे आहेत.

X
COMMENT

Recommended News