• Home
  • Business
  • Google contractors listening, recording your personal talks via Assistant

Gadget Special / सावधान व्हा...! गुगल ऐकत आहे तुमच्या घरातील संभाषणे, पण कंपनीने दिले हे स्पष्टीकरण


सुरक्षा कॅमरे, होम स्पीकर्सदेखील करत आहे रेकॉर्ड
 

दिव्य मराठी

Jul 14,2019 12:20:00 PM IST

गॅजेट डेस्क- आजच्या डिजीटल युगात स्मार्ट डिव्हाइसेजने तुमची अनेक कामे सोपी केली आहेत, पण तुमच्या वयैक्तिक आयुष्यावरही हल्ला केला आहे. तुमच्या बेडरूममध्ये होणारे संभाषण आता गुप्त राहीलेले नाहीये. आतापर्यंत आपण ऐकले होते की, भिंतींनाही कान असतात, पण आता हेच कान तुमच्या रुममध्ये आले आहेत. गुगल तुमचे खासगी संभाषण ऐकत आहे. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, गुगलसाठी काम करणारे थर्ड पार्टी अॅप्लॉंयज स्मार्टफोन, होम स्पीकर आणि सिक्योरिटी कॅमरांवर गुगल असिस्टंटच्या माध्यमातून तुमच्या घरातील सर्व संभाषण रेकॉर्ड केली जात आहेत. यामुळे ग्राहकांच्या वयैक्तिक आयुष्यावर धोका निर्माण झाला आहे. पण गुगलने आपली चूक मान्य केली आहे.

गुगल होम स्पीकर, सुरक्षा कॅमरांमधून रेकॉर्ड होत आहेत संभाषण
बेल्जियमच्या ब्रॉडकास्टर व्ही आरटी एनडब्ल्यूएसनुसार, गुगल होम स्पीकरमधून ग्राहकांची संभाषणे रेकॉर्ड केली जात आहेत आणि क्लिप सब-कॉन्ट्रॅक्ट्सना पाठवली जात आहे. या फाइल्स गुगलच्या स्पीच रिकग्निशनमध्ये सुधार आणण्यासाठी उपयोगात आणल्या जात आहेत. एक विसलब्लोअरच्या उपयोगातून व्ही आरटी एनडब्ल्यू एस गूगल असिस्टंटच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेल्या एक हजारांपेक्षा अधिक फाइल्सला ऐकण्यास सक्षम आहे.

गुगलने काय स्पष्टिकरण दिले ?
गुगलने या रिपोर्टला स्विकारले आहे, पण त्यासोबतच स्पष्ट केले की, या रेकार्डिंग्सना व्हॉइस रिकग्निशन टेक्नोलॉजीला चांगले करण्यासाठी ऐकले जाते. पण, या रिपोर्टमधून परत एकदा ग्राहकांच्या खासगी आयुष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. गुगलचे म्हणने आहे की, यूझर्स आणि गुगल असिस्टंटमध्ये होणाऱ्या अतिशय कमी भागाला कंपनीचे लँग्वेज एक्सपर्ट्स रिव्ह्यू करतात. यासोबतच रिव्ह्यू प्रोसेसदरम्यान यूझर्सच्या खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सेफ गार्डचा वापर केला जातो.

X