आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूज बिझनेसमधून ३२ हजार ९०० कोटी रुपये कमावणाऱ्या गुगलने पत्रकारांना दिला नाही एकही पैसा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - गुगलने मागील वर्षी न्यूज बिझनेसमधून ४७० कोटींचे (सुमारे ३२,९०० कोटी रुपये) उत्पन्न मिळवले आहे. कंपनीला हे उत्पन्न गुगल न्यूज किंवा सर्चच्या माध्यमातून मिळाले आहे. दुसरीकडे मीडिया हाऊसच्या ऑनलाइन जाहिरातींच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. 


यामुळे अनेक मीडिया हाउस एक तर बंद झाले किंवा त्यांना त्यांचा व्यवसाय मर्यादित करावा लागला. न्यूज मीडिया अलायन्स (एनएमए)च्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे. एनएमए अमेरिकेत २,००० पेक्षा जास्त वृत्तपत्रांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे.

 

एनएमएचे अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी डेव्हिड शेवर्न यांनी सांगिल्यानुसार, ज्या पत्रकारांनी या बातम्यांसाठी मेहनत घेतली त्यांना या कमाईतला काही वाटा दिला गेला पाहिजे. 

 

रिपोर्टमध्ये सांगितले की, गूगलने आपले सर्च आणि गुगल न्यूजच्या माध्यमातून 2018 मध्ये वृत्तपत्र आणि प्रकाशकांचा कामातून ही कमाई केली आहे. दरम्यान एनएमएने सावध केले की, गुगलच्या उत्पन्नामध्ये बातम्यांद्वारे मिळणारे उत्पन्नाचा समावेश करण्यात येऊ नये. कारण हे उत्पन्न ग्राहकाने एखाद्या लेखाला पसंत केल्याने किंवा त्यावर क्लिक केल्याने मिळाले आहे. 

 

अमेरिकेमध्ये लॉबिंगवर गुगल सर्वाधिक खर्च करते. सेंटर फॉर रिस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्स (सीआरपी) नुसार गुगलने २०१८ मध्ये लॉबिंगवर २.१७ कोटी डॉलर (सुमारे १५२ कोटी रुपये) खर्च केले, तर २००९ मध्ये हा खर्च केवळ ४० लाख डॉलर (२०.५ कोटी रुपये) होता.