आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूगलने लाँच केले नवीन फीचर, हरवलेला फोन शोधणे झाले सोपे, बिल्डिंग, मॉल्स आणि एअरपोर्टच्या मधला दिसेल व्ह्यू...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गॅजेट डेस्क- गूगलने त्यांच्या 'फाइंड माय डिवाइस'मध्ये एक नवीन फीचर अॅड केले आहे,ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन वापस मिळवू शकता. गूगलने त्यांच्या 'फाइंड माय डिवाइस'मध्ये 'इंडोर मॅप्स' नावाचे नवीन फीचर अॅड केले आहे, त्याच्या मदतीने एअरपोर्ट किंवा बिल्डिंगच्या आतील व्ह्यू पाहता येतो. 
 
इंडोर मॅप्सच्या मदतीने युझर्स बिल्डिंगच्या आतील भागातील दृश्य पाहू शकतात, त्यासोबतच हे देखील पाहू शकतात की, त्यांनी त्यांचा फोन कुठे ठेवला आहे. पण गूगल कडून अधिकृत माहिती आलेली नाहीये की, कोणत्या बिल्डिंग आणि एअरपोर्टच्या आतील भाग पाहता येईल.

जोपर्यंत फोन सापडत नाही तोपर्यंत तो लॉक राहील


फाइंड माय डिवाइस अॅपमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन नुसार, नवीन फीचर एअरपोर्ट, मॉल्स आणि मोठ्या बिल्डिंगमध्ये अॅंड्रॉयड फोन यूझर्सना त्यांचा फोन शोधण्यास मदत करेल आणि जोपर्यंत फोन सापडत नाही तोपर्यंत फोन लॉक करता येईल.

 

या डिस्क्रिप्शनमध्ये लिहीले आहे की, फाइंड माय डिवाइस अॅप यूझर्सना त्यांच्या डिवाइसच्या सध्याची किंवा आधीची लोकेशनच्या आधारावर मॅप दाखवतो. याची खास बाब म्हणजे तुमचा डिवाइस लॉक किंवा सायलेंट मोडवर असला तरी तुम्ही त्याचा फूल व्हॅाल्यूमवर अलर्ट चालु करू शकता.

 

असा शोधा तुमचा हरवलेला मोबाईल
आपल्या फोनमध्ये 'फाइंड माय डिवाइस' अॅप इंस्टॉल करा आणि त्याच्यासाठी लोकेशन नेहमी ऑन ठेवा म्हणजे फोन हरवला तर त्याची लोकशन शोधणे सोपे होईल.

 

फोन हरवल्यावर इंटरनेट ब्राउझरवर जाऊन android.com/find वर जा आणि गूगल अकाउंट वरून साइन-इन करा, त्यानंतर आपल्या डिवाइसवर क्लिक करा.

 

त्यानंतर हरवलेल्या डिवाइसवर एक अलर्ट मेसेज पाठवला जाईल, आणि नंतर तो डिवाइस त्याच्या लोकेशन नुसार गूगल मॅपवर दिसेल. त्या मॅपच्या आधारावर यूझर फोनला शोधू शकातात.


या अॅपमध्ये मिळतात हे फायदे
या अॅपच्या मदतीने युझर त्यांच्या हरवलेल्या फोनला लॉक करू शकातात, किंवा त्या फोन मधीन सर्व डेटाला डिलीत करू शकातात.

 

किंवा त्या फोनची रिंगटोन वाजवू शकतात ज्यामुळे युझरला त्याचा फोन सापडेल.

 

बातम्या आणखी आहेत...