आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलने कॉल व मेसेजशी अॅप्सचा अॅक्सेस केला बंद; ई-कॉमर्स कंपन्यांवर होणार मोठा परिणाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- युजर्सचा डेटा लीक होत असल्याच्या प्रकरणावर मार्ग काढण्यासाठी गुगलने युजर्सचे कॉल आणि मेसेजशी मोबाइल अॅप्सचा असलेला अॅक्सेस बंद केला आहे. याचा सर्वात मोठा परिणाम आर्थिक क्षेत्रात सेवा देणाऱ्या कंपन्यांसह ई-कॉमर्स कंपन्यांवर होणार आहे. यामुळे पेटीएमसारखे अॅप मोबाइल युजरचे कॉल आणि मेसेजपर्यंत पोहचू शकणार नाही. 


या कंपन्या मोबाइल युजरने दिलेल्या माहितीच्या आधारे युजरचे क्रेडिट प्रोफाइल तयार करत होत्या. यातून ग्राहकाच्या आवडीनिवडी कळू शकत होत्या. तज्ज्ञांनुसार, गुगलने हा निर्णय काटेकोरपणे राबवला तर पेटीएम आणि फ्लिपकार्टसारख्या छोट्या स्टार्टअपच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 


जेवढी परवानगी, तेवढाच अॅक्सेस आता मिळणार
या निर्णयामुळे आता युजर जेवढी परवानगी देईल तेवढाच अॅक्सेस कंपन्यांना मिळेल. पूर्वी युजरने परवानगी दिल्याशिवाय अॅप सुरू करता येत नव्हते. दरम्यान, ज्या कंपन्या याच डेटावर विसंबून आहेत त्यांना यातून सूट मिळू शकते.  

 

बातम्या आणखी आहेत...