Home | International | Other Country | google knows everything about you

गुगलची तुमच्या भविष्यावर गुपचूप नजर, सिम काढले तरी लोकेशन समजते, ई-मेलमध्ये काय आहे याचीही मिळते माहिती

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Aug 26, 2018, 09:49 AM IST

लोकेशन ऑफ असूनही गुगल युजर्सना ट्रॅक करते, असे अलीकडेच समोर आले आहे.

 • google knows everything about you

  लोकेशन ऑफ असूनही गुगल युजर्सना ट्रॅक करते, असे अलीकडेच समोर आले आहे. पण हे झाले फक्त लोकेशनबाबत. गुगल आपल्या प्रत्येक पावलाला, कामाला ट्रॅक करत आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जर गुगलने तुमचा डेटा आणि इंटरनेटशी संबंधित गोष्टी ट्रॅक केल्या तर ते तुमचे भविष्यही सांगू शकते. तेही अगदी काही मिनिटांत.

  आयटी तज्ज्ञ अभिषेक धाभई यांनी सांगितले की, सुमारे चार वर्षांपूर्वी मी एका विकसित देशाच्या सरकारसोबत अशाच प्रकारचे डेटा विश्लेषणाचे काम केले होते. तेव्हा त्या देशात सामूहिक अत्याचाराच्या घटना वाढल्या होत्या. जे लोक सामूहिक अत्याचाराशी संबंधित कंटेंट सर्च करत होते त्यांची माहिती सरकारने गुगलकडे मागितली होती. अभिषेक म्हणाले की, असे लोक धोकादायक आहेत असे मानून सरकार त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. भविष्य लक्षात घेऊन हे करण्यात आले होते. अशाच प्रकारे जर एखादा युजर दर शनिवारी मुंबईचे तिकीट काढत असेल, तेथे एखाद्या जपानी रेस्तराँत जेवत असेल तर गुगलला त्याचा भविष्यातील कल कळतो. आपण जे ई-मेल करतो, नव्या नोकऱ्यांसाठी अर्ज पाठवतो, ऑनलाइन वस्तू मागवतो तेही कळते. हा सर्व डेटा कस्टमाइज करून गुगल तुमचे भविष्य सहजपणे सांगू शकते. तुम्ही कशाच्या तयारीत आहात हे तुमच्या सर्च हिस्ट्रीच्या ट्रेंडवरून सांगता येऊ शकते.

  > गुगल २४ तास अशी करते आपल्यावर निगराणी
  १. गुगलचे अॅप्स सर्व्हरवर पाठवतात लोकेशन
  गुगलचे मशीन लेव्हल प्रोग्रामिंग असे आहे, जे कंपनीच्या अॅपचा वापर केल्यावर युजरचे लोकेशन ट्रॅक करते आणि सर्व्हरवर पाठवते. गुगल मॅप्स, व्हॉइस, जीमेल, क्रोम हे सर्व अॅप्स लोकेशन ट्रॅक करतात. त्याची माहिती गुगल सर्व्हरला देतात, त्याला हिस्ट्री म्हणतात. त्यामुळे लोकेशन बंद केले तरी तुम्ही कुठे आहात याची माहिती मिळते. एका अहवालानुसार, अँड्रॉइड फोन लोकेशनशी संबंधित ४० इनपुट प्रतितास आणि आयफोन सुमारे ४ इनपुट प्रतितास पाठवतात. गुगल तुमचे जीपीएस लोकेशन आणि जवळच्या सेलफोन टॉवरच्या लोकेशनचेही रेकॉर्ड ठेवते.

  २. आपण काय सर्च करतो हे शोधतात कुकीज
  इंटरनेटवर तुम्ही काय शोधता हे गुगलला माहीत आहे. गुगलच्या काही कुकीज अशा आहेत, ज्या मॅक आयडी आणि आयपी अॅड्रेसच्या काॅम्बिशेनद्वारे युजर कोण आहे याची माहिती मिळवतात. वारंवार एकच कॉम्बिनेशन आल्यास, सामान्यत: ही व्यक्ती काय सर्च करते याची माहिती मिळते. अशाच प्रकारे जर आपल्या जीमेल आयडीने लॉगीन केले असेल तर तुमच्या आयडीने सर्च केलेल्या सर्व गोष्टींची माहिती गुगलला मिळत आहे. गुगल आयडेंटिफायर कुकीजही तुमच्या संगणकात इन्स्टॉल करतात.

  ३. तुम्ही काय सेव्ह करता? : अापण अनेकदा गुगलचे फाेटो अॅप किंवा क्लाऊडमध्ये स्वत:च्या कुटुंबाची छायाचित्रे अपलाेड करताे. ती सुरक्षित असतात व कुणाशी शेअरही केली जात नाहीत; परंतु ती गुगलकडे सेव्ह हाेत असतात. केवळ छायाचित्रेच नव्हे, तर त्याची संपूर्ण माहितीदेखील गुगलकडे जाते. जसे- तुम्ही एखादे छायाचित्र किती एडिट केले, कुणाला टॅग केले, काेणत्या शहरात व किती वाजता ते छायाचित्र काढले, त्याचे स्थळ, माेबाइलचा सिरियल क्रमांक इ.


  गुगलला माहीत आहेत तुमच्या या गोष्टी
  १.नाव, २. जन्मदिवस, ३. लिंग, ४. मोबाइल क्रमांक, ५. तुमचे गुगल सर्च, ६. ज्या वेबसाइट्सवर तुम्ही गेलात त्या, ७. तुम्ही सध्या कुठे उभे आहात, ८. गेल्या काही वर्षांत तुम्ही कुठे गेले/राहिले, ९. कोणता गेम, गाणे, चित्रपट आवडतात, १०. कुठे काम करता, ११, कुठे राहता, १२. मेल, १३. व्हॉइस रेकॉर्डिंग, १४. कोणत्या गोष्टींची आवड आहे, १५. फोटो, १६. फोनबुक/काँटॅक्ट्स, १७. कोणकोणते अॅप वापरता, १८. आवड-नावड, १९. जास्त काय खरेदी करता, २०. सध्या तुम्ही कशात व्यग्र आहात?


  या समस्यांवर अशी करा मात
  - लोकेशन हिस्ट्री वाचवण्यासाठी डेटा अँड पर्सनलायझेशन टॅबमध्ये लोकेशन हिस्ट्रीत जाऊन सेटिंग ऑफ करा. जो फोन आणि संगणक तुम्ही वापरता त्यात हे करा, भलेही सर्वात एकच अकाउंट असो.
  - जीपीएस सिग्नल्स गरज असेल तेव्हाच ऑन करा. वेब अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंगपासून वाचवण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन गुगल अकाउंटमध्ये डेटा अँड पर्सनलायझेशन टॅबवर वेब अँड अॅप अॅक्टिव्हिटी ऑफ करा.
  - गुगल व्हाॅइस सर्चचा डेटाही सेव्ह ठेवते. तो आपण व्हॉइस अँड ऑडिओ अॅक्टिव्हिटी पेजमध्ये जाऊन पाहू शकतो आणि डिलीट करू शकतो.
  - फोटो अपलोड करण्याआधी कॅमेरा अॅपमध्ये ऑल अॅप सेक्शनमध्ये सेटिंगमध्ये जाऊन सेव्ह लोकेशन ऑफ करा. गुगल फोटोजमध्ये मेन्यू सेटिंगमध्ये लोकेशनमध्ये जिओलोकेशन बंद करा. गुगल तुमच्या लोकेशनचे इस्टिमेट करते, ते बंद करण्यासाठी इस्टिमेट लोकेशन फीचर डिसेबल करणे आवश्यक आहे. त्यासाठी फोटो लायब्ररीत फोटोवर क्लिक करून इन्फो आयकॉनमध्ये रिमूव्ह लोकेशनला क्लिक करा.
  - गुगल आपल्या जाहिरातदारांकडून आपल्या सर्चद्वारे आपली आवड समजून घेऊन जाहिराती दाखवते. त्यामुळे आपला संपूर्ण सर्च डेटा गुगलकडे जातो. आपल्या प्रोफाइलमध्ये आपली सर्च हिस्ट्री आणि यूट्यूब सर्च हिस्ट्री स्टोअर होते. ती रोखण्यासाठी अॅड सेटिंगमध्ये जाऊन अॅड पर्सनलायझेशनला ऑफ करू शकता.

Trending