आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Google Maps Causes Divorce After Husband Spots 'cheating' Wife Cuddling Another Man

बाहेर जाण्यासाठी रस्ता शोधत होती व्यक्ती, गूगल मॅपवर दिसले असे काही की, आयुष्यात आले वादळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिमा. पेरुमध्ये एका व्यक्तीला त्याची पत्नी धोका देत असल्याचे कळाले, त्यानंतर त्याने तिला घटस्फोट दिला. हा व्यक्ती जेव्हा गूगल मॅपवर रस्ता शोधत होता, तेव्हा त्याला कळाले की, त्याची बायको त्याला धोका देत आहे. याच दरम्यान त्याला त्याची बायको एका दुस-या व्यक्तीसोबत दिसली. यानंतर हे दोघं वेगळे झाले. 


प्रेमीच्या डोक्यावरुन हात फिरवत होती महिला 
- ही स्टोरी दक्षिण अमेरिकी देश पेरुची राजधानी लिमामध्ये राहणा-या एका व्यक्तीची आहे. त्याने 2013 मध्ये आपल्या बायकोला गूगल मॅपच्या माध्यमातून एका दूस-या व्यक्तीसोबत पाहिले. 
- या व्यक्तीने सांगितल्या नुसार तो त्या दिवशी गूगल मॅपच्या माध्यमातून रस्ता शोधण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला एक असा फोटो दिसला, यामध्ये ती महिला हुबेहूब त्याच्या पत्नीसारखे कपडे घातलेली दिसली. त्याने लक्षपुर्वक पाहिल्यावर कळाले की, ती त्याची पत्नी होती. 
- यानंतर त्या व्यक्तीने बायको घरी येण्याची वाट पाहिली. ती येताच तो खुप रागात होता. सुरुवातीला बायकोने त्याच्या गोष्टी मान्य केल्या नाही. पण जेव्हा नव-याने फोटो दाखवला तेव्हा तिने अफेअर असल्याचे मान्य केले. 
- विशेष म्हणजे ती महिला आपल्या प्रेमीसोबत शहराच्या सर्वात फेमस साइटच्या बेंचवर बसून फोटो काढत होती. जेव्हा व्यक्तीने गूगल मॅपच्या माध्यमातून त्यांना पाहिले तेव्हा तिचा प्रेमी तिच्या मांडीवर डोक ठेवून झोपलेला होता. महिला त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत होती. 
- या कपलचे नाव समोर आले नाही. परंतु हा फोटो पाहिल्यानंतर त्या व्यक्तीने बायकोसोबत घटस्फोट घेतला. या व्यक्तीने बायकोचा तो फोटो फेसबुकवर शेअर केला. 
- गूगल मॅप्स आणि गूगल स्ट्रीट व्ह्यूच्या माध्यमातून घेतलेल्या फोटोमुळे घडणारी ही पहिली घटना नाही. यापुर्वीही असे अनेक प्रकरण समोर आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...