आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरड्या दिव्यांशीने पेंटिंगमध्ये झाडांना घातले बूट; त्यांना लावले पंख, गुगलने बनवले पेंटिंगलाच डुडल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राम खटाना 

गुरगाव - हरियाणातील गुरगाव येथे राहणारी ७ वर्षांची दिव्यांशी सिंघल सुटीच्या काळात आजीच्या घरी लखनऊला गेेली होती. आजीच्या घरी झाड तोडताना पाहून तिला खूप रडू आले. झाडे तोडण्यात येत असल्याने वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले असल्याचे तिला शिकवण्यात आले होते. दिल्ली -एनसीआरमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे शाळेत जाताना जीव गुदमरल्यासारखा होतो. आईने तिला ड्रॉईंग पेपर दिला आणि सांगितले, झाड तोडल्याने तिच्या मनात जे काही विचार सुरू आहेत, त्यावर चित्र काढून दाखव. दिव्यांशीने चित्र काढले. तिने झाडाला बुटे घातली. त्यांना चालता यावे म्हणून पंख दिले. आपण झाडे तोडण्याऐवजी वाचवण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे नमूद केले. तिची आई दीप्तीने हे पेंटिंग गुगलद्वारे आयोजित ‘वॉकिंग ट्री’मध्ये स्पर्धेत पाठवले. दिव्यांशीला यातून काही प्रेरणा मिळेल म्हणून स्पर्धेत भाग घेण्याचे आईने ठरवले होते. आश्चर्य म्हणजे, दिव्यांशीच्या पेंटिंगला १.१ लाख स्पर्धकांतून पहिला क्रमांक मिळाला. गुगलने गुरुवारी तिच्या पेटिंगला डुडलवर स्थान दिले. विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जातात


दिव्यांशीची आई दीप्ती सिंघल या मुक्त कलावंत आहेत. त्या दीप्तीला कला व पेंटिंगशी संबंधित क्रिएटिव्हिटी शिकवतात. दिव्यांशीने सांगितले, मी झाडे वाचवण्याच्या थीमला अशा प्रकारे मांडले की,  जर यांना चालता आले असते तर त्यांना वाचवणे शक्य होते. परंतु विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जात आहेत. यामुळे प्रदूषण सातत्याने वाढते आहे. दिव्यांशी व तिचे आई-वडील गुरगावमध्ये राहतात. तिचे वडील नितीन सिंघल एका मल्टिनॅशनल कंपनीत व्यवस्थापक आहेत. आई म्हणाली, दिव्यांशी चार वर्षांची होती तेव्हापासून कला व क्रिएटिव्हिटीच्या कार्यक्रमात भाग घेत आहे. स्काॅलरशिपसाठी सात लाख रुपये देतात


देशातील सर्वच शहरांतील स्पर्धकांतून गुगलने खूपच क्रिएटिव्ह व प्रेरणादायी स्पर्धक दिव्यांशीची निवड केली. ज्युरीने १.१ लाख कलाकृतीतून २० जणांची निवड केली. सर्व कलाकृतींना कलात्मक योग्यता, रचनात्मकता व थीमच्या मानदंडाबरोबरच वेगळा दृष्टिकोन म्हणून या कलाकृतींची निवड करण्यात आली.  २० अंतिम डुडलसाठी ऑनलाइन सार्वजनिक मतदान घेण्यात आले. त्यात राष्ट्रीय विजेत्याबरोबरच पाच समूह विजेत्यांचीही निवड करण्यात आली. गुगल दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करते. देशभरातील मुलांना थीम बेस टास्क दिला जातो.