आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूगलने हुवावेसाठी अँड्रॉयड प्लॅटफॉर्म केले बंद, गूगलचे कोणतेच अॅप्सदेखील चालणार नाहीत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- गूगलने चीनचा टेलीकॉम कंपनी हुवावेद्वारे अँड्रॉयडचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. हुवावेच्या स्मार्टफोनवर आता गूगलचे कोणतेच अॅप्स चालणार नाहीत. अमेरिकेकडून हुवावेला एनटिटी लिस्टमध्या सामिल केल्यामुळे गूगलने हुवावेवर बंदी आणली आहे. अमेरिकेच्या एनटिटी लिस्टमध्ये सामिल असलेल्या कंपन्या तेथील फर्मोंकडून लायसेंसविना व्यापार करू शकणार नाहीत.


हुवावे आपली ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च करणाच्या तयारीत
हुवावेकडून तुर्तास कोणतीही प्रतिक्रीया आली नाहीये. पण दोन महिन्यांपूर्वी कंपनीचे सीईओ, रिचर्ड यू म्हणाले होते की, हुवावे प्लॅन-बी अंतर्गत मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम तयार करत आहे.

 

सीसीएस इनसाइट कंसल्टंसीच्या बेन वुड यांचे म्हणने आहे की, गूगलच्या निर्णयामुळे हुवावेला कंज्यूमर बिझनेसमध्ये अडचणी येतील. पण, हुवावे ओपन सोर्स लाइसंसच्या वापराने अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टीमचे व्हर्जनचा वापर करू शकते.

 

हुवावे जगातील सगळ्यात मोठी टेलीकॉम उपकरण निर्माता आणि दुसरी मोठी स्मार्टफोन विक्रेती कंपनी आहे. अमेरिकेला कंपनीवर चीनसाठी हेरगिरी करण्याचा संशय आहे. पण हुवावेने आपल्या उपकरणातून हेरगिरीच्या आरोपांना फेटाळून लावले आहे.

 

अमेरीकेच्या सांगण्यावरून मीगील वर्षी हुवावेचे सीएफओ मेंग वांगझू यांना कॅनडात अटक करण्यात आले होते. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. अमेरिका मेंगच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न करत आहेत. हुवावेकडून ईरानवर लागू असलेल्या अमेरिकेच्या प्रतिबंधांना तोडल्याच्या आरोपाखाली मेंगला ताब्यात घेण्यात आले होते.
 

बातम्या आणखी आहेत...