आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात 500 युजर्सवर सरकार समर्थित सायबर हल्ला, फिशिंग ई-मेलद्वारे लक्ष्य

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली - भारतात या वर्षी जुलै ते सप्टेंबरपर्यंत आपल्या सुमारे ५०० युजर्सवर सरकारचे समर्थन असलेल्या हल्लेखोरांमार्फत सायबर हल्ला झाला असल्याचा दावा गुगलने केला आहे. याबाबत या युजर्सना गुगलने इशारा देणारे मेलही पाठवले आहेत. जगभरातील १४९ देशांत १२ हजारहून अधिक युजर्सना हा इशारा देण्यात आला आहे. अशातच इस्रायली स्पायवेअर पेगाससच्या मदतीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जगभरातील १४०० हून अधिक पत्रकार व मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या फोनमध्ये घुसखोरी करण्यात आल्याचे नुकतेच व्हॉट्सअॅपने मान्य केले होते. भारतात यात १२१ जणांना लक्ष्य करण्यात आले होते. गुगलनुसार, त्यांचा थ्रेट अॅनालिसिस ग्रूप (टीएजी) ५० देशांतील २७० हून अधिक टार्गेटेड किंवा सरकारचा पाठिंबा असलेल्या समूहांवर लक्ष ठेवून असतो. यात कुणाचेही नाव कंपनीने घेतलेले नाही. हे समूह गुप्त माहिती जमा करणे, बौद्धिक संपदेची चोरी, वैचारिक भिन्नता असलेल्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करणे किंवा चुकीची माहिती पसरवणे असे कारस्थान करत असतात. कंपनीने मिळवलेल्या या गुप्त माहितीचा उपयोग कंपनीची पायाभूत रचना वाचवण्यासाठी तसेच युजर्सना संरक्षण देण्यासाठी करते.

फिशिंग ई-मेलद्वारे लक्ष्य
ज्या युजर्सना इशारा देण्यात आला आहे त्यातील ९० टक्के जणांना फिशिंग ई-मेल्सद्वारे लक्ष्य करण्यात आले आहे. या टार्गेडेट युजर्सचे पासवर्ड आणि खात्यासंबंधीची माहिती मिळवण्याचा असे हल्ले करणाऱ्यांचा प्रयत्न असतो. यातून खाती हायजॅक केली जातात.

बातम्या आणखी आहेत...