Smartphone धारकांसाठी Google ने जारी केला अलर्ट; लगेच करा हे एक काम, अन्यथा होऊ शकतो सायबर हल्ला

दिव्य मराठी वेब टीम

Mar 09,2019 04:51:00 PM IST

युटीलिटी डेस्क - जगातील सर्वात मोठे इंटरनेट सर्च इंजिन गुगलने जगभरातील स्मार्टफोन यूजर्सला अलर्ट जारी केला आहे. यामध्ये Android आणि IOS अशा दोन्ही स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. गुगलचे क्रोम ब्राउझर सर्वांनी वेळीच अपडेट करून घ्यावे. कंपनीने हा अलर्ट वाढत्या सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जारी केला. यानंतरच गुगलने क्रोमचे लेटेस्ट व्हर्जन 72.0.3626.12 रोलआउट केले आहे.


जुन्या व्हर्जनमध्ये आला bug...
गुगलने आपल्या ऑफिशियल सिक्युरिटी ब्लॉगवर ही माहिती दिली. त्यानुसार, क्रोम ब्राउझरच्या जुन्या व्हर्जनमध्ये CVE-2019-5786 नावाचे बग (व्हायरस) आले होते. ते सध्या दुरुस्त करण्यात आले असून नवीन व्हर्जन सुद्धा देण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना गुगलचे सिक्युरिटी अॅन्ड डेस्कटॉप इंजिनिअर जस्टिन शू यांनी सांगितले, की हा बिघाड यापूर्वीच्या बगपेक्षा वेगळे आहे. हा बग क्रोममध्ये येणारे कोड टार्गेट करत असतो. त्यामुळे, स्मार्टफोनधारकांना विनाकारण वेळोवेळी फोन रीस्टार्ट करावे लागते. नवीन व्हर्जन जारी करून तो बिघाड दूर करण्यात आला आहे.


असे करा अपडेट
अॅन्ड्रॉइड यूजर्स क्रोम अपडेट करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊ शकतात. यामध्ये Chrome सर्च करावे आणि अपडेटवर क्लिक करावे. अशाच पद्धतीने iOS यूजर्स अॅप स्टोअरमध्ये जाऊन हीच प्रक्रिया करू शकतात.

X
COMMENT