Gadget / गुगलच्या कृत्रिम प्रज्ञेचा राेबाे दहावी गणिताच्या परीक्षेत नापास, ४० पैकी १४ गुण मिळाले, समीकरण चुकले

डीपमाइंडचे काम अल्गाेरिदम बनवणे, विद्यार्थ्यांसाठी अनेक अॅपही बनवले

दिव्य मराठी

Apr 30,2019 09:25:00 AM IST

न्यूयाॅर्क - माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला गुगलचा प्रीमियर आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय) प्राेग्राम डीपमाइंड मॅथ्सची सामान्य परीक्षाही उत्तीर्ण हाेऊ शकला नाही. दहावी गणिताच्या अभ्यासक्रमाचे धडे दिल्यानंतरही एआय सिस्टिम ४० पैकी १४ गुणच प्राप्त करू शकली. गुगलच्या कृत्रिम प्रज्ञे(एआय)च्या या प्रणालीच्या गणिताच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे एआय राेबाेवर माेठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


मंगळवारी जारी डीपमाइंडच्या संशाेधनानुसार, त्यांच्या एआय सिस्टिमच्या अल्गाेरिदमला अल्जेब्रा, कॅलकुलस, प्राेबॅबिलिटीसारख्या गणितातील अनेक प्रकरणांत प्रशिक्षित केले हाेते. असे असले तरी चाचणीदरम्यान डीपमाइंडला प्रश्नांचा अनुवाद करण्यात खूप कष्ट घ्यावे लागल्याचे दिसले. राेबाेला प्रश्न साेडवायलाही बरेच झगडावे लागले. प्रश्नांत अनेक शब्द, चिन्हे, फंक्शन्स हाेते. ते साेडवण्यासाठी डीपमाइंड वास्तविक अंदाज लावू शकला नाही. कारण,एआय निश्चित केलेल्या पॅटर्नमध्येच डेटा स्कॅन करताे. त्यामुळे माणसाला ज्यात काैशल्य आहे, त्यात ताे चांगली कामगिरी बजावू शकत नाही. समीकरण बदलण्यात सुमार ठरताे.


डीपमाइंडचे काम अल्गाेरिदम बनवणे, विद्यार्थ्यांसाठी अनेक अॅपही बनवले
गुगल डीपमाइंडचे मुख्य काम अल्गाेरिदम विकसित करणे आहे. हे एक प्रकारचे गणिताचे निर्देश असतात, जे प्रश्नांची उत्तरे देतात. कंपनीने गेल्या दाेन वर्षांत विद्यार्थ्यांसाठी अनेक प्राेग्राम व अॅपही तयार केले आहेत. यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाच्या एका मालिकेचाही समावेश आहे. यानंतर गुगलला एक नवी आेळख मिळाली.

X