आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोरखपूरच्या हिमांशू गौरव सिंह याने जेईई अॅडव्हान्स्डमध्ये संपूर्ण देशात दुसरा रँक मिळवला आहे. हिमांशू सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी होता. त्याला केमिस्ट्री व अॅस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाडमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’ने त्याची मुलाखत घेतली. त्याची अभ्यासाची तयारी, आवडी-निवडी व भविष्यातील त्याच्या योजना याबद्दल माहिती जाणून घेतली. त्याने दिलेली उत्तरे -
> दिव्य मराठी - हिमांशू तुला जेईई अॅडव्हान्सडमध्ये ऑल इंडिया सेकंड रँक मिळाला, त्याबद्दल अभिनंदन! या यशाबद्दल तुला काय वाटते?
हिमांशू- खूप आनंद वाटला. त्याहून मला खूप समाधान वाटले. कारण माझ्या सर्व प्रयत्नांना यश मिळाले. माझ्यावर एक दबाव होता, ते ओझे आता उतरले आहे.
> दिव्य मराठी- या यशासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागली असणार, हे तर उघडच आहे. तू रोज किती तास अभ्यास करतोस? एखाद्या विद्यार्थ्याच्या यशात कोचिंग क्लासचा किती सहभाग असतो?
हिमांशू - मी नियमित ६ ते ७ तास अभ्यास करतो. कधी-कधी दबाव आला तर घरी अथवा शिक्षकांशी बोलतो. यामुळे तणाव नाहीसा होतो. मला वाटते, तुम्हाला विषय किती आवडतो, यावर बरेच काही अवलंबून आहे. मी गोरखपूरमध्ये FIITJEE मध्ये गेलो होतो. त्यानंतर दिल्लीला आलो. माझी तयारी करवून घेण्यात व जडणघडणीत शिक्षकांचे मोठे सहकार्य आहे. जर FIITJEE मध्ये गेलो नसतो तर असे यश मिळाले नसते. सुरुवातीला मी खूप लाजाळू आहे. परंतु आता खूप चांगल्या पद्धतीने माझे मत मांडू शकतो. पूर्वीपेक्षा आता चांगल्या पद्धतीने तणावमुक्त होऊ शकतो. याचे श्रेय शिक्षकांनाच आहे.
> दिव्य मराठी - विद्यार्थ्यांचे यश कोचिंग निवडण्यावर अवलंबून आहे. असेल तर काय करावे लागेल.
हिमांशू - काेचिंग लावायची की नाही, हा निर्णय विद्यार्थ्याने आपली क्षमता व कोचिंगमुळे मिळणारे फायदे पाहूनच घ्यायचा आहे. अनेकदा काेचिंगच्या नावावर फायदा कमी व वेळेचा अपव्यय जास्त होण्याची शक्यता असते.
> दिव्य मराठी-हिमांशू, तुझ्या कुटुंबात कोण, कोण आहेत? तुझ्या यशावर पालकांची प्रतिक्रिया काय होती?
हिमांशू - माझे शिक्षण गोरखपूरच्या अकॅडमिक हाइड्स हायस्कूलमध्ये झाले. वडील लवकुशसिंह कौशांबीच्या शासकीय पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेत विभागप्रमुख आहेत. साहजिकच मला मिळालेल्या यशाने आई वडिलांना खूप आनंद झाला. माझी आई रुपासिंह हिचा माझ्या यशात महत्वाचा वाटा आहे. तिने माझ्या शिक्षणासाठी केंद्रीय विद्यालयाची नोकरी सोडली.
> दिव्य मराठी - भविष्यातील तुझ्या योजना काय आहेत? तू शिक्षण क्षेत्रात जाऊ इच्छितोस का?
हिमांशू - मला शिकवण्याची आवड आहे. परंतु मी पीजी केल्यानंतर संधी मिळाली तर नक्कीच शिकवण्याचे काम करेनही.
> दिव्य मराठी - विद्यार्थ्यांची चांगली जडणघडण करण्यासाठी काय करावे? असे तुला वाटते.
हिमांशू - आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मला वाटते. त्याचबरोबर फीडबॅकची सोय असावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेतला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांचा विकास होतो. ते स्वत: उत्तम तयारी करू शकतील.
दिव्य मराठी - शिक्षणाबरोबरच कोणता खेळ आवडतो. फावल्या वेळेत काय करतोस?
> हिमांशू - मला गाणे गायला आवडते. मी फार वाईट गात नाही. बॅडमिंटन व टेबल टेनिस खेळण्याची आवड आहे. पण खेळायला वेळ कमी मिळतो. पण जेव्हा मिळतो, मी त्याचा आनंद घेतो.
दिव्य मराठी - हिमांशू, तू आमच्याशी बोललास. सविस्तर माहिती दिलीस याबद्दल तुझे मन:पूर्वक आभार! तुझ्या भावी वाटचालीस आमच्या शुभेच्छा !
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.