आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात गाेरंट्याल, परतूरला जेथलिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भाजपने आपली पहिली यादी जाहीर करताच काँग्रेसने लगाेलग ५१ उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेली दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (दक्षिण कराड), कैलास गाेरंट्याल (जालना) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या वेळी पक्षाने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दाेन्ही पूत्रांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार अमित देशमुख (लातूर शहर) यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले हाेते. आता दुसऱ्या यादीत त्यांचे धाकटे बंधू धीरज यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील विभागनिहाय उमेदवारांची नावे अशी...

मराठवाडा
हिंगोली- भाऊराव पाटील, परतूर-सुरेशकुमार जेथलिया, जालना- कैलाश गोरंट्याल, लातूर ग्रामीण- धीरज देशमुख, उमरगा- दिलीप भालेराव.

उत्तर महाराष्ट्र
धुळे ग्रामीण कुणाल पाटील, मालेगाव बाह्य-डॉ. तुषार शेवाळे, चांदवड-शिरीषकुमार कोतवाल, इगतपुरी-हिरामन खोसकर.

मुंबई-ठाणे-कोकण
भिवंडी प. - शोएब अश्फाक, कल्याण प. - कांचन कुलकर्णी, डोंबिवली - राधिका गुप्ते, बोरिवली-कुमार खिल्लारे, दहीसर-अरुण सावंत, मुलुंड-गोविंद सिंह, जोगेश्वरी पू. - सुनील कुमरे, कांदिवली-पू.-अजंता यादव, चारकोप-कालू बुधेलिया, गोरेगाव-युवराज मोहिते, अंधेरी पूर्व-जगदीश आमीन, विलेपार्ले-जयंती सिरोया, माहीम-प्रवीण नाईक, शिवडी-उदय फणसेकर, मलबार हिल-हिरा देवासी, उरण- मनीष पाटील, पेण-नंदा म्हेत्रे, राजपूर-अविनाश लाड.

विदर्भ
मलकापूर-राजेश एकडे, चिखली- राहुल बोंद्रे, जळगाव जामोद- स्वाती वाकेरकर, अकोट- संजय बोडखे, अकोला पूर्व- विवेक पारसकर, वाशिम-रजनी राठोड, अचलपूर- अनिरुद्ध देशमुख, वर्धा- शेखर शेंडे, उमरेड- राजू पारवे, नागपूर द. गिरीश पांडव, नागपूर प.-विकास ठाकरे, आमगाव-साहसराम करोटे, आरमोरी-आनंदराव गेडाम, गडचिरोली- चंद्रा कोदावाते, राजुरा-सुभाष धोटे, बल्लारपूर- डाॅ. विश्वास झाडे, वणी- वामनराव कासावार, राळेगाव- वसंत पुरके, आर्णी-शिवाजीराव मोघे, उमरखेड-विजय खडसे.

पश्चिम महाराष्ट्र
शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट, कसबा पेठ- अरविंद शिंदे, द. कराड- पृथ्वीराज चव्हाण, इचलकरंजी-राहुल खंजिरे, सांगली-पृथ्वीराज पाटील.

काँग्रेसच्या २२, राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांची प्रतीक्षा
काँग्रेसने पहिल्या यादीत ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली हाेती, आता दुसऱ्या यादीत ५२ उमेदवारांची नावे जाहीर केली. आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला १२५ जागा आलेल्या असून त्यापैकी २२ उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. तर मित्रपक्ष राष्ट्रवादीने मात्र अद्याप एकही अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...