आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला धक्का : नोएडात निवडणुकीच्या स्थगितीस कोर्टाचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर (नोएडा) लोकसभा मतदारसंघातील गुरुवारी होणार्‍या मतदानाची प्रक्रिया स्थगिती देण्यास नकार दिला. येथून काँग्रेसचे तिकीट मिळाल्यानंतर उमेदवार रमेशचंद्र तोमर यांनी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तोमर यांनी कॉँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर 21 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी दोन एप्रिलपर्यंत प्रचारही केला. त्यांनी कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून मते मागितली. यानंतर ते अचानक भाजपच्या तंबूत गेल्याचे कारण देत याचिकाकर्त्यांनी ही मागणी केली होती. तोमर यांनी यातून कॉँग्रेस सर्मथकांना धोका दिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने न्यायालयास निर्देश देऊन या जागेवर 10 एप्रिल रोजी होणारी निवडणूक स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र, न्या. रंजना प्रकाश देसाई आणि मदन बी. लोकुर यांच्या पीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. याचिकेत तथ्य नसल्याने ती फेटाळत असल्याचे न्यायालय म्हणाले.