आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; 23 वर्षांच्या संघर्षाला यश, नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गोवारी समाजाच्या 23 वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या समाजाला ST कोट्यातून आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निकाल दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून हा समाज आपल्या न्याय्य मागणी आणि हक्कांसाठी लढत होता. आपल्या हक्कासाठी या समाजाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार, आपल्याला ओबीसी वर्गातून काढून एसटी शेड्युल ट्राइब्सचा दर्जा द्यावा आणि त्यातूनच आरक्षणाचा लाभ मिळावा अशी त्यांची मागणी होती. दरम्यान, गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. अखेर आपल्याला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया या समाजातून व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...