आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवारी हे आदिवासीच; हायकोर्टाचा निर्वाळा, जमातीचा संघर्ष फळाला, 'एसटी'चे मिळणार लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गोवारी समाज हा आदिवासीच असून ही अनुसूचित जमातीतील स्वतंत्र जमात असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या या निकालामुळे गोवारींना अनुसूचित जमातीचे सर्व लाभ मिळण्याचा मार्ग अखेर अनेक दशकांच्या संघर्षानंतर मोकळा झाला. न्या. आर. के. देशपांडे आणि न्या. अरुण उपाध्ये यांच्या खंडपीठाने मंगळवारी हा निकाल दिला. 


महाराष्ट्राशी संबंधित विशेष मागास वर्ग व केंद्राच्या इतर मागास वर्गांच्या संयुक्त यादीत गोवारींची नोंद असली तरी अनुसूचित जमातींसाठी देय लाभ नाकारता येणार नाहीत, यावर उच्च न्यायालयाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. या संदर्भात आदिम गोवारी मंडळ, वैशाली प्रकाश राऊत, आदिवासी गोंड गोवारी मंडळ, आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळ यांच्या पाच याचिका विचाराधीन होत्या. 


राज्य सरकारने पुरेशा गांभीर्याने हे प्रकरण हाताळलेच नाही. माना आदिम जमात मंडळ प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तरी राज्य शासनाने हा मुद्दा पुरेशा गांभीर्याने हाताळणे गरजेचे होते, या शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. 


११४ प्राण गमावले 
गोवारी समाजाने १९९४ मध्ये नागपुरात विधान भवनावर मोर्चा काढल्यावर तेथे लाठीमारामुळे चेंगराचेंगरी होऊन ११४ जणांना प्राण गमवावे लागले होते. सुमारे पाचशे जखमी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...