sangali flood / सरकार मदतीऐवजी जाहिरातबाजीत व्यग्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांचा आरोप

प्रकाश आंबेडकरांनी सांगलीत स्थलांतरितांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकरांनी सांगलीत स्थलांतरितांची भेट घेतली.

मुख्यमंत्री कोल्हापुरात राहिले असते तर प्रशासन गतिमान झाले असते - आंबेडकर 

दिव्य मराठी

Aug 13,2019 08:47:00 AM IST

सांगली - पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार स्वतःची जाहिरात करण्यात व्यग्र आहे. अलमट्टी धरणाची उंची आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थितीकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. शिरोळ तालुक्यात विविध ठिकाणी स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांंची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. पूरग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा दिलासाही त्यांनी दिला.


आंबेडकर म्हणाले, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पाणी आेसरण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. महापुरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्याची मदत करावी. वंचित आघाडी मुंबई, कोल्हापूर, सांगलीत मदतीसाठी संकलन केंद्र उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.


हेलिकाॅप्टरचा उपयोग केवळ मंत्र्यांसाठी : हेलिकाॅप्टर केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी वापरली गेले. मुख्यमंत्री कोल्हापुरात राहिले असते तर प्रशासन गतिमान झाले असते. केरळ सरकारने नागरिकांच्या सुटकेसाठी मच्छीमारांचा वापर केला होता, तशी कल्पकता फडणवीस सरकारला दाखवता आली नाही, असे आंबेडकर म्हणाले.


निवडणुका ढकलण्याचा निर्णय आयोगाचा : २००५ मधील पूरस्थितीवेळी आघाडी सरकारकडून अशीच कुचराई झाली होती. सध्या विदर्भातही पूरस्थिती आहे. त्याकडेही दुर्लक्ष असल्याचे ते म्हणाले. पूरस्थितीमुळे राज्यातल्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात का, या प्रश्नावर हा निवडणूक आयोगाचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेसबरोबरची आघाडीची चर्चा जैसे थे असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

X
प्रकाश आंबेडकरांनी सांगलीत स्थलांतरितांची भेट घेतली.प्रकाश आंबेडकरांनी सांगलीत स्थलांतरितांची भेट घेतली.