आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- देशातील २५ राज्यांत १०० टक्के घरांत वीज पोहोचवण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. त्यानुसार या राज्यांमध्ये २.३९ कोटी घरांत वीज पोहोचवण्यात आली. १६,३२० कोटी रुपयांच्या सौभाग्य योजनेअंतर्गत २.४९ कोटी घरापर्यंत वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे.
देशभरातील गावांमध्ये वीज जोडणी देण्याच्या कामावर लक्ष ठेवणारी केंद्र सरकारची अधिकृत वेबसाइट 'सौभाग्य'नुसार सरकारने ९५.७२% कुटुंबांना वीज पुरवण्यात आली आहे. ४.२८% (१०.४८ लाख कुटुंब) कुटुंबांना वीज जोडणे मिळणे बाकी आहे. उर्वरित कुटुंबांना २६ जानेवारीपर्यंत वीज जोडणी मिळण्याची आशा आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान घरोघर वीज योजनेनुसार (सौभाग्य) १०० टक्के देशातील विद्युतीकरण प्रजासत्ताक दिनाआधी (२६ जानेवारी) प्राप्त केले जाईल. सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत २.३९ कोटी कुटुंबांना प्रकाशमान केले आहे.
९४ लाख वीज जोडणी देऊन यूपी सौभाग्य'शाली प्रदेश :
सौभाग्य योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशात ९४ लाख घरांना वीज जोडणी दिली आहे. या यशामुळे यूपी alt147सौभाग्य'शाली राज्य झाले आहे. संपूर्ण देशात उत्तर प्रदेशने सर्वाधिक ७४ लाख कुटुंबांना वीज जोडणी देत डिसेंबरअखेरपर्यंत योजनाअंतर्गत राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. २०१७ मध्ये भाजप सरकार अाल्यानंतर २५ हजार दुर्गम भागातील कुटुंबांना सौर ऊर्जेद्वारे वीज दिली.
सरकारचे दोन विरोधी दावे :
सरकारने सोमवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले की, आता केवळ चार राज्ये- आसाम, राजस्थान, मेघालय व छत्तीसगडमध्ये १०.४८ लाख घरांत वीज पोहोचवणे बाकी आहे. सौभाग्यच्या डॅशबोर्डमधील माहितीनुसार, आसाम, राजस्थान, मेघालय व छत्तीसगडशिवाय कर्नाटक व अरुणाचल प्रदेशातील १०.६८ लाख घरांना वीज जोडणे देणे बाकी आहे. यामध्ये सर्वात जास्त आसामच्या ५.६ लाख घरांपर्यंत वीज पोहोचली नाही. याअंतर्गत राजस्थान ३.१ लाख घरांना वीजपुरवठा करावयाचा आहे.
२०१५ मध्ये सौभाग्य योजनेची सुरुवात :
सरकारने वीज घेण्यासाठी इच्छुक कुटुंबांना जोडणी देण्याची मुदत ३१ मार्च २०१९ निश्चित केली होती. यानंतर ती ३१ डिसेंबर २०१८ करण्यात आली. सरकारने सौभाग्य योजनेची सुरुवात ऑगस्ट २०१५ मध्ये केली होती. या योजनेअंतर्गत सर्व ५,९७,४६४ गाव व ५ कोटींहून जास्त घरे ग्रिडशी जोडली आहेत.
१९४७ : १५०० गावांतच वीज होती
२००५- २०१४ : आणखी १०,८२,२८० वीज पोहोचली. २०१५-२०१८: ५,९७,४६४ गावांत वीज पोहोचली आहे. म्हणजे सरासरी वार्षिक १.९९ गावे जोडावयाची अाहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.