आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 जानेवारीपासून वापरावे लागणार हे खास हेल्मेट, सरकरने जारी केला नवीन आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : दुचाकी चालकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हेल्मेटसाठी नवीन निकष तयार केले आहेत. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयानद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, हेल्मेट तयार करणाऱ्या कंपन्यांना 15 जानेवारीपासून या निकषांचे कोणत्याही परिस्थितीत पालन करावे लागणार आहे. कंपन्यांनी जर याचे पालन केले नाही तर त्यांना 2 वर्षांचा कारावास आणि 2 लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सोबतच हेल्मेटची विक्री करणाऱ्यांना आणि हेल्मेटची संचयित करणाऱ्यांना देखील हे निकष लागू होणार आहेत. 
 

हे आहेत नवीन नियम
 

- रस्ते परिवहन आणि राज्य महामार्ग मंत्रालयानुसार, 15 जानेवारीनंतर फक्त ISI प्रमाणिक हेल्मेट्सची विक्री करावी लागणार आहे. 
 
- हे हेल्मेट ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) चाय IS 4151:2018 च्या निकषांवर खरे उतरणे गरजेचे आहे. 

- IS 4151:2015 च्या नवीन निकषांनुसार, नवीन हेल्मेटचे कमाल वजन 1.2 किलो असावे. आता ही मर्यादा 1.5 किलो करण्यात आली आहे. 
 
- विना ISI निकष तयार करणे, विकणे आणि त्यांना संचयित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. 

- इंडस्ट्रियल हेल्मट परिधान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

 

हेल्मेट निर्मात्यांनी केले सरकारच्या निर्णयाचे स्वागत 

सरकारकडून हेल्मेटबाबत जारी केलेल्या निकषाचे हेल्मेट निर्मात्यांनी स्वागत केले आहे. स्टीलबर्ड हेल्मेटचे एमडी राजीव कपूर यांचे म्हणणे आहे की, नॉन-आयएसआय मार्कवाले हेल्मेटची विक्री करणे म्हणजे खोटी औषधी विकण्यासारखे आहे. खोटी औषधी जशी हानिकारक आणि विषारी असते तसेच डुप्लीकेट हेल्मेट जीवघेणे ठरू शकते. त्यांना सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारने हा निर्णय घेतला असून त्याचे आम्ही स्वागत करतो. 


स्टीलबर्डने नवीन निकषांनुसार तयार हेल्मेट 

आशियातील सर्वात मोठी हेल्मेट निर्माता स्टीलबर्ड हायटेक इंडिया कंपनीने नवीन निकषाच्या आधारे हेल्मेट तयार करणार असल्याची घोषणा केली आहे. स्टीलबर्डनुसार, त्यांनी आपल्या सर्व हेल्मेट्समध्ये नवीन निकषांनुसार बदल केले आहेत. तसेच नवीन निकषांना पूर्ण करण्यासाठी बीआयएसतर्फे आवश्यच परवानगी आणि प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्यांनी सांगितले की, स्टीलबर्ड आयएस 4151:2015 ची परवानगी घेणारी पहिली कंपनी बनली आहे. राजीव कपूरने सांगितले की, आमच्याकडे हेल्मेटचे तीन वेगवेगळ्या आकारातील 60 पेक्षा अधिक मॉडल आहेत. तसेच 180 हेल्मेटची नविन निकषांनुसार तयार करण्यासाठी परीक्षण आणि चाचणी करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...