आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Government Declares Corona A National Crisis After 91 People Are Infected, 4 Lakh Help To Family In Case Death By Corona

91 जणांना लागण झाल्यानंतर सरकारने कोरोनाला राष्ट्रीय संकट घोषित केले, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला 4 लाखांची मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 13 राज्यात कोरोना संक्रमित व्यक्ती, केरळनंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त 19 जणांन लागण
  • दिल्ली आणि कर्नाटकमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू, पंजाबमध्ये परदेशातून आलेल्या 6011 जण निगरानीत
  • मुंबईमध्ये शॉपिंग मॉल-सिनेमा हॉल बंद, बंगळुरुत संशयित कर्मचारी आढळल्याने इंफोसिसने ऑफीस बंद केले

नवी दिल्ली- देशात 91 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारने शनिवारी राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. गृह मंत्रालयने देशात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्यास, कुटुंबाला 4 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत दिली जाईल. कोरोना संबंधी मदत कार्याल सहभागी लोकांनाही भरपाईमध्ये सामील करण्यात आले आहे. आतापर्यंत देशातील 13 राज्यांमध्ये संक्रमण पसरले आहे. राज्य सरकारकडून जारी केलेल्या आकड्यानुसार, देशात आतापर्यंत 91 जणांना कोरोनाची लागण
झाल्याचे समोर आले आहे.


यातच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यात एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये वडील आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याची पुष्टी गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने शनिवारी केली. तेलंगाणामध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. शनिवारी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही रुग्णांना गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याशिवाय दोन संशयित रुग्णांनाही निगरानीत ठेवले आहे, त्यांची रिपोर्ट येणे बाकी आहे.

आतापर्यंत 10 रुग्ण बरे झाले


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आतापर्यंत 10 कोरोनाग्रस्त रुग्ण ठीक झाले आहेत. यात उत्तर प्रदेशचे 5, केरळचे तीन, राजस्थान आणि दिल्लीचे प्रत्येकी एक रुग्ण आहे. यांना उपचारानंतर हॉस्पीटलमधून डिस्चार्ज करण्यात आले. संक्रमण थांबवण्यासाठी गोव्यात स्कूल-कॉलेजसोबतच पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेले बीस कसीनो, बोट बार आणि डिस्को क्लब 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. तर, मुंबई आणि बंगळुरुमध्ये शॉपिंग मॉल आणि सिनेमागृहदेखील बंद करण्यात आले आहेत.