आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी संपली तरी सरकारने डाळ दिली नाही, अमरावतीत डाळीचा तुटवडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती  - गरीबांना गोड पदार्थाचे दोन घास खाता यावे, पोट भरता यावे म्हणून शासनाने स्वस्त धान्य दुकान (रेशन धान्य) योजना सुरू केली. मात्र या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. जिल्हा पुरवठा विभागाने िदवाळीसाठी शासनाकडे त्यांच्याच िनर्णयानुसार, चना डाळीची मागणी केली होती. िदवाळी आटोपून एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्यापही शासनाकडून चना डाळ पोहोचली नाही. त्यामुळे गरीब लाभार्थ्यांना चनाडाळ आणि बेसनापासून िनर्मित पदार्थांपासून वंचित राहावे लागले तसेच काहींना खिशातील पैसे खर्च करून बाजारातून महागडी डाळ खरेदी करून आणावी लागली. 
जिल्ह्यात २० शासकीय धान्य गोदामं आहेत. त्यापैकी बहुतांश गोदामांवर अजुनही डाळ पोहोचली नाही. केवळ उडदाच्या डाळीचे वाटप आता कुठे सुरू झाले अाहे. जिल्ह्यात ९७० क्विंटल उडद डाळीची मागणी असून अजूनही ती पूर्ण झाली नाही. त्याचप्रमाणे १९४० क्विंटल चना डाळीची मागणी असताना डाळच पोहोचली नाही. त्यामुळे शासनाचे िनर्णय कसे बेभरवशाचे असतात याचा प्रत्यय गरीब लाभार्थ्यांना आला आहे. 


अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब असे एकूण ४ लाख ७ हजार ३८६ कार्ड धारक आहेत. यापैकी अमरावती शहर, बडनेरा, भातकुली व ग्रामीण भाग िमळून सर्वाधिक १ लाख २ हजार ७२५ कार्ड धारक आहेत. चना डाळीची सर्वाधिक ९०० क्विंटल मागणी ही याच भागात होती. मात्र येथील लाभार्थी चना डाळीपासून वंचित राहिले असून त्यांना अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला आहे. शासनाकडून आपल्याला यंदा िदवाळीत चना व उडद डाळ िमळणार अशी आशा होती ती डाळ अद्याप िमळाली नसल्याने कार्डधारक लाभार्थी िनराश झाले आहे. िदवाळी तर संपली आता उशिरा डाळ िमळणार त्याचा तसा फारसा लाभ नाही, असे मत कार्डधारकांनी व्यक्त केले. काहींनी तर उशिरा िदवाळी साजरी करावी लागणार असा टोमणाही मारला. 

 

केवळ तीन-चार गोदामांमध्येच आली डाळ 
आम्ही शासनाकडे त्यांच्याच िनर्णयानुसार १९४० क्विंटल चना डाळीची मागणी केली होती. मात्र जिल्ह्यातील तीन-चार गोदामं वगळता कुठेही चना डाळ पोहोचली नाही. अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी 

बातम्या आणखी आहेत...