आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Government Employee In This State Of India Work For 5 Days Only CM Said, 'take Care Of Health'

भारताच्या या राज्यामध्ये आठवड्यात 5 दिवसच काम करतील सरकारी कर्मचारी, सीएम म्हणाले - 'स्वास्थ्याकडे लक्ष द्या...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सिक्किम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेम सिंह तमांगने सोमवारी सिक्किमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. पी एस गोलेच्या नावाने लोकप्रिय तमांगला राज्यपाल गंगा प्रसादने येथे पलजोर स्टेडियममध्ये शपथ दिली. त्यांच्यासोबत एसकेएमच्या 11 विधायकांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यांनंतर मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांगने असमच्या कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट दिले. आता सिक्किमच्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही आठवड्यातून केवळ 5 दिवसच काम करावे लागेल. म्हणजेच शनिवारी आणि रविवारी राज्य कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाईल.  

 

शपथ घेतल्यानंतरच सीएम प्रेम सिंह तमांगने घोषणा केली आणि म्हणाले, सुट्टीचा उपयोग सरकारी कर्मचारी स्वास्थ्य आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी वापरावी. सीएम प्रेम सिंह तमांगने घोषणा केल्यानंतर सांगितले, 'आम्ही निवडणुकीत केलेल्या चार वचनांपैकी एक वचन पूर्ण केले.' अतिरिक्त सुट्टीचा वापर कर्मचारी आपले स्वास्थ्य आणि कुटुंबाच्या हितासाठी करू शकतील. 'सीएम प्रेम सिंह तमांगने असमचे सरकारी ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांना या परंपरेबद्दल सांगितले आणि कुटुंबासारखे काम करायला सांगितले.