आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणात असलेले घर सोडवून देण्याचे आमिष दाखवून, महिलेवर बलात्कार करणारा शासकीय वाहनचालक अटकेत...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-अतिक्रमणात असलेले घर सोडवून देण्याचे आमिष दाखवून घरात घुसून ४५ वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या भूजल सर्वेक्षण विभागात चालक असलेल्या आरोपीला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. रानबा ऊर्फ ज्ञानोबा वामनराव जाधव (५७, रा. शासकीय निवासस्थान, छावणी) असे आरोपीचे नाव आहे. २६ डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजता ही घटना घडली होती. तक्रारदार महिलेच्या वडिलांच्या नावावर असलेले घर अतिक्रमणात असल्याची नोटीस देण्यात आली होती. त्यासंदर्भात अधिक चौकशी करण्यासाठी महिला विभागीय आयुक्तालय परिसरात तिची अडचण सांगत असताना एकाने स्वत:हून बोलणे सुरू करत अडचण सोडवण्याचे आमिष दाखवले. तसेच महिलेच्या घरी जावून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. ११ जानेवारी रोजी बेगमपुरा पाेलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला १४ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली. 

बातम्या आणखी आहेत...