आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंगायतांना ‘ओबीसी’तून आरक्षणासाठी सरकार अनुकूल; मागासवर्ग आयाेगाकडे प्रस्ताव द्या : मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी दिले. तसेच मंगळवेढा येथील जगद्‌ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.


लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, सामाजिक व आर्थिक मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग मंत्री संजय कुटे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह विविध जिल्ह्यांतील लिंगायत समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


मुख्यमंत्री म्हणाले, लिंगायत रेड्डी, हिंदू लिंगायत व हिंदू वीरशैव  लिंगायत समाजातीलच उपजाती आहेत. त्यांचा समावेश इतर मागास वर्गामध्ये करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा. त्यांनी तातडीने निर्णय घेण्यासंदर्भात मागासवर्ग आयोगास विनंती केली जाईल.