आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: डिलिव्हरीच्या वेळी गर्भाबाहेर दिसला हात, कंपाउंडरने एवढ्या जोरात ओढला की धडाचे झाले दोन तुकडे, मग म्हणतो- पेशंट सीरियस झालाय, दुसरीकडे न्या..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जैसलमेर (राजस्थान) : जैसलमेर येथे एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे.  येथील रामगडच्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यामुळे केलेल्या कृत्यामुळे. त्याला देवही क्षमा करणार नाही. कुटुंबीयांनी महिलेला प्रसुती पीडादरम्यान रामगड सामुदायिक रूग्णालयात दाखल केले. तेथे कंपाउंडर अमृतराम हा कार्यरत होता. त्यानेच प्रसुती करण्याचा प्रयत्न केला. प्रसुती दरम्यान मुलाचे शरीर उलटे होते. अमृतरामने मुलाचे पाय पकडून इतके जोरात ओढले की, धडाचे दोन तुकडे झाले. मुलाचे शरीर बाहेर आणि डोके गर्भातच राहिले. 

 

कंपाउंडरने एका कुटुंबाच्या आनंदाला लावले ग्रहण

मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी दीक्षा कंवरला प्रसुती वेदना सुरू झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला रामगड रूग्णालयात दाखल केले. तेथे भर्ती केल्यानंतर अमृतराम याने त्यांना जैसलमेरला जाण्यास सांगितले. जैसलमेर येथील जवाहर रूग्णालयातील कर्मचारी डॉ.रवींद्र सांखला यांना रामगड येथून सांगण्यात आले की, डिलेवरी झाली आहे पण नाळ आतच राहिली आहे. नंतर त्यांनी महिलेची शस्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीच समजले नसल्याने त्यांनी तिला जोधपूरला जाण्यास सांगितले. 

 

जोधपूर येथे महिलेच्या पोटातून काढले मुलाचे डोके 
जैसलमेर येथील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दीक्षाचे कुटुंबीय तिला घेऊन जोधपूर येथील उमेद रूग्णालयात गेले. येथे महिलेची प्रसुती करण्यात आली पण फक्त मुलाचे डोकेच बाहेर आले. यानंतर तो सर्व प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यांनी मुलाचे डोके थेट रामगड पोलिस ठाणे गाठले. सध्या दीक्षाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जोधपूर येथे उपचार सुरु आहेत. 

 

चौकशीनंतर रामगड रूग्णालयातून आणले शिशूचे शरीर

महिलेचे कुटुंबीय मुलाचे डोके घेऊऩ रामगड पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी तेथे डॉक्टरांची चौकशी केली असता त्यांनी मुलाचे शरीर पोलिसांकडे सुपूर्द केले. याबाबत महिलेचा पती तिलोकसिंहने रामगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेहाच्या दोन भागांचे पोस्टमार्टम करण्यात येत असल्याचे 
उपनिरीक्षक जालमसिंह यांनी सांगितले. 

 

शिशू मृत होता - वैद्यकीय प्रभारी

रामगड वैद्यकीय प्रभारी डॉ.निखिल शर्माने सांगितले की, महिलेला रूग्णालयात दाखल केले असता शिशूचे पाय बाहेर दिसत होते आणि तो मृत होता. येथे पूर्ण सुविधा उपलब्ध नसल्याने तिला जैसलमेर येथे पाठविण्यात आले. याबाबत भास्करने कंपाउंडर अमृतरामशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

 

दोन तीन दिवसांपूर्वी रामगड येथून एक केस रेफर होऊन आली होती. याबाबत मला उशीरा रात्री कॉल आला. मी रूग्णालयात गेले असता प्रसुती झाली आहे पण नाळ आतमध्ये राहिल्याचे मला सांगण्यात आले. मी नाळ काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच समजत नव्हते. दुसऱ्या दिवशू सकाळी पुन्हा प्रयत्न केला. मोठ्या शस्त्रक्रियेचे आवश्यकता होती म्हणून जोधपूरला रेफर करण्यात आले. 

-डॉ. रवींद्र सांखला, स्त्री रोग विशेषज्ञ, जवाहर रूग्णालय

 

बातम्या आणखी आहेत...