Gadget News / तुम्ही Tiktok आणि Helo अॅपचा वापर करता का...? तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे

RSS ने सांगितले की, हे अॅप्स अँटी-नॅशनल अॅक्टिविटीजला चालना देतात

दिव्य मराठी वेब

Jul 18,2019 03:49:00 PM IST

गॅजेट डेस्क- सरकारने Tiktok आणि Helo सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला 21 प्रश्नांसोबत नोटिस जारी केली आहे. तसेच या प्रश्नावर योग्य उत्तरे दिली नाही तर दोन्ही अॅप्स बॅन केले जातील, असे सांगितले आह. हे पाऊल मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि IT (Meity) डिपार्टमेंटने उचलले आहे. या अॅप्सबद्दल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने तक्रार दिली होती. RSS ने सांगितले की, हे अॅप्स अँटी-नॅशनल अॅक्टिविटीजला चालना देतात.

जेव्हा Tiktok आणि Helo सोबत कॉन्टॅक्ट करण्यात आला, तेव्हा त्यांनी एका जॉइंट स्टेटमेंट देत सांगितले की, ते येणाऱ्या तीन वर्षात 1 बिलिअन डॉलर तंत्रज्ञानाला विकसित करण्यासाठी आणि स्थानीक समाजाची जबाबदारी घेण्यासाठी गुंतवणूक करणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयने हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स देश विरोधी कारवायांचे केंद्र बनले आहे, यावर उत्तर मागितले आहे. तसेच त्यांना भारतीय युझर्सची माहिती कोणत्याही सरकारला आणि परदेशी कंपन्याना न देण्याची ताकिद दिली आहे. तसेच या प्लॅटफॉर्म्स वयाच्या अटीचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. भारतात 18 वर्षांपेकक्षा कमी वयाच्या मुलाला लहान माणले जाते, पण या अॅप्सवर 12-13 वर्षांच्या मुलाचेही अकाउंट उघडले जाते. यावरही कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

X
COMMENT