आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्याऱ्या नक्षलींना सरकारी नोकरी, पीडितांना मात्र भोपळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगड - छत्तीसगडमधील बस्तर प्रभाग. या प्रभागातील सात जिल्हे नक्षली हिंसाचारग्रस्त आहेत. येथे अशी शेकडो कुटुंबे आहेत, ज्यांच्या सदस्यांना हेरगिरी किंवा लष्करी दलांना सहकार्य करण्याच्या आरोपावरून ठार करण्यात आले आहे. या सदस्यांनी बलिदान देऊनही नातेवाइकांना सरकारतर्फे ना नोकरी मिळाली ना भरपाई. दुसरीकडे आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी आहेत. निर्दोष ग्रामस्थांचे प्राण घेणाऱ्या नक्षलींना शासनाच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत सर्व सुविधा दिल्या जात आहेत. त्यांना शेती आणि पुरस्काराची रक्कम तर मिळतेच, शिवाय प्रोत्साहित करण्यासाठी सरकारी नोकरीही दिली जात आहे. 

 

काही पीडित कुटुंबांच्या म्हणण्यानुसार, नक्षलींच्या पुनर्वसन धोरणाबाबत आमची तक्रार नाही, तर सरकारच्या धोरणाबाबत आमची नाराजी आहे. या धोरणात ज्यांनी सर्वकाही गमावले त्यांना मदत करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले जात नाही, याउलट सर्वकाही हिसकावून घेणारे आरामशीर राहत आहेत. दुसरीकडे, काही कुटुंबांतील लोक नाराजी व्यक्त करत म्हणतात की, अशा लोकांना तर गोळी मारायला पाहिजे होती, तर उलट त्यांचा सत्कार केला जात आहे. अनेक वर्षांपासून मदतीची प्रतीक्षा करणारे पीडित भरपाई आणि नोकरीच्या मागणीसाठी एकजूट होत आहेत. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे ज्यांना आपले गाव, घर, जमीन सोडून भानुप्रतापपूर, पखांजूर, कोयलीबेडा या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला अशी ही नक्षलग्रस्त कुटुंबे आहेत. पीडित ललिता विश्वकर्मा, द्वारूलाल सलाम, शंकरलाल भोयर यांच्यासह ५१ कुटुंबे आपली व्यथा सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली होती. 

 


पीडित कुटुंबांनी सांगितले की, ज्या नक्षलींच्या नावावर हत्या आणि इतर प्रकरणे समोर आली आहेत त्यांना आज पोलिसांनी नोकरी दिली आहे. एकेकाळी नक्षली कमांडर आणि डीसीए सदस्य सुभाषची जिल्ह्यात दहशत होती. आज तो कोंडागावमध्ये हेड कॉन्स्टेबल आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. दुसरीकडे, नक्षलवाद्यांशी लढत असताना शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना किरकोळ नोकऱ्या दिल्या जात आहेत. नरहरपूरच्या (कांकेर) कुंतीबाई (६५) आपला उपनिरीक्षकपदी असलेला मुलगा शहीद झाल्यानंतर दोन वर्षांपासून अनुकंपा नियुक्तीसाठी भटकत होत्या. कुंतीबाईंचा मुलगा पुष्पराजसिंह नागवंशी २६ जून २०१६ ला कोंडागाव जिल्ह्यातील कुधूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झाला होता. कुंतीबाईंच्या पतीचा आधीच मृत्यू झालेला आहे. आता त्या दोन वर्षांपासून मोठा मुलगा धनराजसिंहला अनुकंपा धोरणाअंतर्गत पोलिसांत नोकरी देण्याची विनंती करत आहेत. पण जिल्हा पोलिसांनी मोठा भाऊ धनराजचे वय जास्त आहे असे कारण देत नियुक्तीस नकार दिला आणि प्रकरण फाइलबंद केले. प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले तेव्हा त्याला किरकोळ नोकरी दिली. 
 

बातम्या आणखी आहेत...