Home | Business | Industries | Government may decrease GST and toll tax on e-vehicles

इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नाही द्यावा लागणार रोड आणि टोल टॅक्स; सरकारने सादर केला प्रस्ताव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:09 AM IST

इ-व्हेईकल्सच्या उत्पादनात आणि विक्रित वाढ करण्यासाठी सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहे.

 • Government may decrease GST and toll tax on e-vehicles

  नवी दिल्ली- इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणाऱ्या कंपनी आणि या गाड्यांना खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लवकरच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. सरकारच्या एका पॅनलने देशभरात ई-मोबिलिटीला चालना देण्यासाठी अनेकप्रकारचे प्रस्ताव सादर केले आहे. त्यातच इलेक्ट्रिक वाहनांवर कस्टम ड्युटी आणि जीएसटी रद्द करण्याचा समावेश आहे. त्यामुळे निती आयोगाकडून ई-व्हेईलकल्स मॅन्युफॅक्चरर्सला इंसेंटिव्ह देण्यासाठी नोडेल एजेंसीने काम सुरू केले आहे. पॅनलद्वारा सादर केलेल्या या इंसेंटिव्हमध्ये इ-व्हेईकल्स खरेदीवर रोड टॅक्स किंवा टोल टॅक्समध्ये सूट देण्याविषयी म्हटले आहे.

  पुढील स्लाइडवर वाचा- ग्राहकांना कसा होईल फायदा

 • Government may decrease GST and toll tax on e-vehicles

  असा मिळेल फायदा
  > इ-व्हेईकल्सच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगवर इंपोर्ट ड्यूटी रद्द केली जाणार आहे. त्यासोबतच या गाड्यांवरील जीएसटीसुद्धा कमी करण्यात येणार आहे. लोकांनी या वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी करावे यासाठी सरकारने या वाहनांच्या रजिस्ट्रेशन रेट्ससह रोड टॅक्स आणि पार्किंग चार्ज कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

   

  पुढील स्लाइडवर वाचा- इ-व्हेईकलमुळे उपलब्ध होतील रोजगाराच्या मोठ्या संधी

   

 • Government may decrease GST and toll tax on e-vehicles

  उपलब्ध होतील रोजगाराच्या मोठ्या संधी
  > सध्या देशासमोर अनेक मोठे प्रश्न आवासून उभे आहे. त्यात इंधनाचा बेसुमार वापर, कार्बनचे वाढते प्रमाण, आणि नोकरीची कमतरता यांचा समावेश आहे. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी इ-व्हेईकल्सचे मोठे योगदान असणार आहे. कारण इ-व्हेईकल्समुळे कार्बन एमीशन कमी होईल, नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, क्रडू ऑईलचा कमी वापर होईल. त्यासाठी देशात एक मोठे आणि स्वस्त इलेक्ट्रिक मोबिलिटी इकोसिस्टिम तयार करावी लागेल. त्यासोबतच देशात इ-व्हेईकल्सच्या उत्पादनात वाढ करुन जागोजागी चार्जिंग पॉईंटचे नेटवर्क तयार करावे लागणार आहे. यातूनच देशातील तरुणांसाठी मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. 

   

Trending