आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 ते 10 लाख उत्पन्नावरील कर २०% वरून १० टक्के करणार, दिवाळीपूर्वी घोषणेची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंबोलिक फोटो - Divya Marathi
सिंबोलिक फोटो

नवी दिल्ली - सरकार दिवाळीपूर्वीच आयकराच्या दरांत कपात करू शकते. एक मीडिया रिपोर्टनुसार 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या इनकमवरील टॅक्स 20% हून 10% केल्या जाऊ शकतो. 10 लाख इनकमवरील टॅक्स 30% हून 25% करण्याची शक्यता आहे. सेस आणि सरचार्ज रद्द हटवण्याबाबत सुद्धा विचार सुरू आहे. तसेच, काही कर सूट पर्याय देखील दूर केले जाऊ शकतात.
 

5 लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री
स्टँडर्ड डिडक्शन50 हजार रूपये
 4.5 लाख वर अद्यापही 20% टॅक्स90 हजार रूपये
टॅक्स 20% कमी करून 10% केला तर 45 हजार रूपये
बचत45 हजार रूपये

 

टास्क फोर्सने सूचित केले की 2 कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर 35% कर आकारला जातोः अहवाल
इंग्रजी वृत्तपत्र 'हिंदुस्तान टाइम्स’च्या रिपोर्टनुसार सरकार निर्णय घेतेवेळी डायरेक्ट टॅक्स कोडवर टास्क फोर्सच्या शिफारशी विचारात घेईल. टास्क फोर्सने गेल्या काही दिवसांत सरकारकडे अहवाल सोपवला होता. दुसऱ्या एका रिपोर्टनुसार टास्क फोर्सने 5 ते 10 लाखपर्यंतच्या इनकमवरील टॅक्स 20% हून 10%, तर 10 ते 20 लाखपर्यंतच्या इनकमवरील टॅक्स 30% ऐवजी 20% आणि 20 लाखांहून अधिक इनकमवर 35% टॅक्स ठेवण्याची शिफारस केली. 2 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 35% कर सुचविण्यात आला.

आयकर चालू दर (मूल्यांकन वर्ष 2019-20)

उत्पन्नकर
2.5 लाख रुपये0
2.5 लाख ते 5 लाख पर्यंत 5%
5 लाख ते 10 लाखांपर्यंत 20%
10 लाखांपेक्षा अधिक 30%

5 लाखांच्या उत्पन्नावरील टॅक्समध्ये रिबेटद्वारे संपूर्ण सूट
फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने पाच लाख रुपयांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर सूट देऊन संपूर्ण कर सूट जाहीर केली .म्हणजेच जर इतके उत्पन्न असेल तर रिटर्न भरणे आवश्यक असेल, परंतु जो कर होईल त्यात सूट मिळेल. चालू आर्थिक वर्ष 2019-20 (मूल्यांकन वर्ष 2020-21) साठी विवरण भरताना ही सूट मिळणार आहे. 
 

गेल्या महिन्यात सरकारने कॉर्पोरेट कर देखील कमी केला
असे म्हटले जात आहे की सरकार आर्थिक वाढीचा वेग वाढविण्यासाठी आयकरात कपात करण्याची घोषणा करू शकते. यामुळे लोकांचे बचत होईल, ते अधिक खर्च करतील आणि अर्थव्यवस्थेला गती येईल. यासाठी सरकारने गेल्या महिन्यात देशांतर्गत कंपन्यांसाठीचा कॉर्पोरेट कर 30% वरून 22% पर्यंत कमी करण्याची घोषणा केली होती, पण कंपन्या इतर कोणतीही सूट घेत नसेल तरच हा टॅक्स कमी होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...