आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्ध, अपंग आणि विधवांना मिळणाल नववर्षाची भेट, पेंश्नमध्ये होणार पाच पटीने वाढ, 15 जानेवारीला निर्णय...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 2019 लोकसभा निवडणुकीच्याआधी केंद्र सरकारने वृद्ध, अपंग आणि विधवांना नववर्षाची भेट देण्याची तयारी केली आहे. एका रिपोर्टनुसार केंद्र सरकार वृद्ध, अपंग आणि विधवांच्या पेंश्नमध्ये पाच पटीने वाढ करणार आहे. रामकृपाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत 15 जानेवारीला यावर निर्णय होईल.  

 
इतक्या लोकांना होईल फायदा
सरकारी आकड्यानुसार सध्या देशातल्या 3 कोटी लोकांना पेंशन दिली जाते. यात 2.40 कोटी वृद्ध, 60 लाख विधवा आणि 10 लाख अपंग आहेत. वेगवेगळ्या राज्यात त्यांना 200 रूपयांपासून 5 हजार रूपयांपर्यंत पेंशन दिली जाते. सरकारच्या योजनेत त्यांना आता कमीत-कमी 1000 हजार रूपये पेंशन देण्यात यावी असा प्रस्ताव आहेत. यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने सामाजिक आर्थिक जनगणनेच्या आधारावर 48 हजार कोटींची योजना बनवली आहे. 


बैठकीत केंद्र आणि राज्याच्या भागीदारीवर होईल चर्चा
रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने 15 जानेवारीला होणाऱ्या बैठकीसाठी सदस्य राज्ये, स्वयंसेवी संस्थासोबतच सगळ्या भागीदारांना बोलवले आहे. या सगळ्यांच्या भागीदारीने पेंशनच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल. रिपोर्टनुसार केंद्राने राज्य सरकारसोबत 50-50 टक्क्याच्या भागीदारीवर हा प्रस्ताव मंजुर होऊ शकतो. वाढलेली पेंशन 1 एप्रिलपासून दिली जाईल, यामुळे देशाच्या तिजोरीवर 50 हजार कोटींचा भार पडण्याची शक्यता आहे.


सध्या ही आहे स्थिति
सध्या सगळ्या राज्यात वेगवेगळी पेंशन दिली जाते. दिल्ली, हरियाणा आणि आंध्र प्रदेशमध्ये वृद्धांना पेंशनच्या रूपात 1000 हजार रुपए दिले जातात. तर यूपी, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेशमध्ये 300 ते 650 रुपए पर्यंत दिले जातात. सरकारच्या या योजनेमुळे देशातील 3 कोटी लोकांना फायदा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...