आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Government Removes Helmet Requirement In Cities, Villages Highway Remains Intact

हेल्मेटमुळे मेकअप खराब होतो, हॉर्न ऐकू येत नाही; नागरिकांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हेल्मेट सक्ती रद्द केली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरिकांनी दिली विचीत्र कारणे, 'स्मशानभूमित किंवा एखाद्या मृत व्यक्तीला खांदा देताना हेल्मेट हाता घ्यावे लागतात...'

गांधीनगर(गुजरात)- सरकारने बुधवारपासून शहरी भागात हेल्मेट सक्तीचा नियम रद्द केला आहे. कॅबिनेटने महानगर पालिका आणि नगर पालिकेतील हेल्मेट सक्ती रद्द केली आहे. पण, नॅशनल-स्टेट हायवे आणि पंचायतच्या रस्त्यांवर हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. हा नियम बुधवारपासून लागू करण्यात आला आहे.गुजरात पहिले राज्य आहे, जिथे हेल्मेट न घालणाऱ्यास लागणारा दंड कमी करुन 500 रुपये केला होता. आता नागरिकांच्या समस्या लक्षात घेता हेल्मेट सक्ती बंद केली. 

नागरिकांची विचीत्र कारणे
 
> लग्ना गेल्यावर हेल्मेटमुळे त्रास होतो, यामुळे मेकअप खराब होतो.
> चांगल्या कामात जाताना यामुळे त्रास होतो.
> स्मशानभूमित किंवा मृत व्यक्तीला खांदा देताना हेल्मेट हातात घ्यावे लागते.
> मार्च ते ऑगस्ट खूप गर्मी असते, गर्मीमुळे हेल्मेटमध्ये घाम येतो.
> हेल्मेट घातल्यानंतर इतर वाहनांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही.सोशल मीडियावर हेल्मेटच्या नियमांबाबत खूप राग व्यक्त करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांचे होमटाउन राजकोटमध्ये नियम रद्द करण्यासाठी मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. राज्यात 2018 पासून हेल्मेट न घातल्यामुळे 1500 नागरिकांचा जीव गेला. 6068 अपघात हेल्मेट न घातल्यामुळे 2017 मध्ये झाले, यात 2190 नागरिकांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...