आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता तुम्हा नाही करु शकणार या पदार्थांचे सेवन; सरकारने आणले निर्बंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारने ई-सिगारेट, हीट-नॉट बर्न डिव्हाइस, वेप, ई-शिशा, ई-निकोटीन, फ्लेवर्ड हुक्का यासारख्या अनेक पदार्थांवर बंदी आणली आहे. तसेच सरकारने इलेक्ट्रॉनिक डिलेव्हरी सिस्टिम (ईड्स)च्या माध्यमातून केली जाणारी आयात, विनिर्माण, वितरणावरही निर्बंध लादले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर विभाग (सीबीआयसी)ने यासंबधी एक परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकानुसार, ड्रग कंट्रोलरर्सवर ड्रग अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट 1940 चे पालन न केल्यास आयातित कंसाइनमेंट्स प्रकरणी दंडात्मक कारवाई होऊ शकते.

 

परिपत्रकात सांगितल्यानुसार, कोणत्याही प्रकारच्या आमली पदार्थांची आयात-निर्यात, त्याची विक्री केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सीबीआयसीने हे परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार, सर्व राज्यांना या परिपत्रकातील नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

 

बातम्या आणखी आहेत...