आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने बघावे : खासदार शेट्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नामपूर- देशात आज शेतकरी संकटात सापडला असून सरकारच्या हमीभाव, कर्जमाफी या घोषणा हवेतच विरल्या. किमान अाता तरी शेतकरी आत्महत्या का करतोय याकडे सरकारने गांभीर्याने बघावे. अाजमितीस शेतकरी संकटात सापडला असून कांदा व भाजीपाला त्याला मातीमोल किमतीत विकावा लागत अाहे. शेती संकटात आहे. तर सरकार शेतकरी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळून खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केला. उत्राणे (ता.सटाणा) येथील नवनिर्वाचित बाजार समिती संचालक सत्कार व शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बाेलत हाेते. 


बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे संघटनेचे नेते दीपक पगार यांनी या सभेचे आयोजन केले होते. शेट्टी यांची यावेळी सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी नामपूर बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा, तसेच दूध आंदोलनात अटक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोकळे , महिला अध्यक्ष शैलाताई ढगे, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, हंसराज वडघुले, तालुका अध्यक्ष डोंगर पगार, ज्येष्ठ नेते कुबेर जाधव, कृष्णा जाधव, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब भामरे, सरपंच सौ रत्नाताई पगार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आयोजक दीपक पगार यांनी प्रास्ताविक केले. युवानेते वीरेंद्र पगार यांनी अाभार मानले. नामपूर परिसरातील काँग्रेससह व अनेक पक्षांतील नेत्यांनी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. 

 

शेट्टी यावेळी म्हणाले... 
भारत हा कृषिप्रधान देश फक्त नावाला उरला असून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंंत त्याला काेणी सत्ताधारी पक्ष वाली नाही. नाशिक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अाहे. शेतकरी कर्जमाफी, वीजबिल माफी, उत्पादन दुप्पट करणे, पीकविमा योजना, दुधाला हमीभाव, शेतीमालाला हमीभाव या सर्व फसव्या घाेषणा. आगामी काळात सरकार कोणाचेही येवो आमची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सतत लढ्याचीच राहणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...