आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान हमीभावापेक्षा कमी दरात पीक विक्री करावे लागले, तर किमतीतील फरक सरकार देणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारने बुधवारी पीक खरेदीच्या नव्या धोरणाला मंजुरी दिली. यानुसार तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना किमान हमीभावापेक्षा (एमएसपी) कमी दरात पीक विक्री करावे लागले तर हमीभावाच्या किमतीतील फरक सरकार देणार आहे. या योजनेला “अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान’ (आशा) असे नाव देण्यात आले आहे. कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले की, दोन वर्षांसाठी १५,०५३ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. या वर्षी यातील ६,२५० कोटी रुपये खर्च होतील.


इथेनॉलच्या किमतीत वाढ : पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...