Home | Business | Business Special | government would launch new contraceptive injection for women

भारतीयांना आवडत नाहिये कन्डोम, 8 वर्षात 52 टक्के घसरली विक्री...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 05:29 PM IST

आता सरकारने काढला आहे यावर पर्याय

 • government would launch new contraceptive injection for women

  नवी दिल्ली- प्रभावी गर्भनिरोधक म्हणून भारतीयांना कन्डोम आवडत नाहिये. मागच्या 8 वर्षात कन्डोमच्या विक्रीत 53 टक्के घट झाली आहे. त्याशिवाय पुरूष नसबंदीमध्येही 73 टक्के घसरण झाली आहे. तर 2008 ते 2016 दरम्यान गर्भनिरोधक गोळ्यांचा वापरदेखील 39 टक्के कमी झाला आहे. त्यामुळेच सरकार बाजारात गर्भनिरोधक म्हणून खास इंजेक्शन आणण्याच्या तयारीत आहे. महिला या इंजेक्शनला महिन्यात एक वेळेस घेऊन नको असलेल्या गर्भापासून सुटका मिळू शकते.

  येत आहे गर्भनिरोधक इंजेक्शन
  इंग्रजी वृत्तपत्र मिंटच्या रिपोर्टनुसार एक्सपर्ट्स 'ग्रुप फिक्स्ड डोज काँबीनेशन'ने युक्त गर्भनिरोधक इंजेक्शनला परवानगी देत आहेत. एक्सपर्ट कमेटीला कळाले की हे इंजेक्शन सुरक्षित आहे आणि गर्भनिरोधकसाठी प्रभावी आहे. कमेटीने या इंजेक्शनला प्रभावी गर्भनिरोधकच्या रूपात महिलांसाठी उपलब्ध करण्याची विनंती केली आहे. एक्सपर्ट कमेटीने आपल्या विनंतीत म्हटले की, फिक्स्ड डोज काँबीनेशनच्या गरजेवर खुप विचार विनिमय करण्यात आले आहे. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, भारतीय महिलांना जास्त काळ टिकतील असे गर्भनिरोधक उपलब्ध करून देण्याची गरज आहे.


  एक्सपर्ट कमेटीची विनंती महत्त्वाची आहे कारण, भारतात पुरुष गर्भनिरोधक वापरण्यावर नकारात्मक आहेत. 2017 च्या हेल्थ मिनिस्ट्रीच्या रिपोर्टनुसार केरळमध्ये जिथे पुरूष साक्षरता दर 96 टक्के आहे, तेथे काँडोमचा वापर 42 टक्के कमी झाला आहे.

  कमी होत आहे गर्भनिरोधक वापर
  भारतात गर्भनिरोधकचा वापर कमी होत आहे. 2005-06 मध्ये भारतात गर्भनिरोधकचा वापर 56.3 टक्के होता जो 2015-16 मध्ये कमी होऊन 53.5 टक्के झाला.

  गर्भनिरोधकची चिंता करत नाहीत पुरुष
  2015-16 मध्ये झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या आकडेवारीनुसार पुरूषांचे मानणे आहे की, गर्भनिरोधक हे महिलांशी जोडलेले आहे. पुरुषांना याची चिंता करण्याची गरज नाहीये.

Trending