आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न सोडवणे हे सरकारचे कर्तव्य; अण्णा हजारे यांनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- शेतकरी व जनतेचे जे प्रश्न आहेत, ते सोडवणे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने या मुद्द्यांवर आश्वासन देऊनही त्याचे पालन केले नाही. म्हणूनच २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीला राळेगणसिद्धी येथे आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. 


पत्रात म्हटले आहे, २३ मार्च २०१८ रोजी दिल्लीतील ७ दिवसांच्या उपोषणानंतर मागण्या पूर्ण करण्यासाठी डॉ. जितेंद्र सिंह यांच्या स्वाक्षरीने पत्र मिळाले होते. सरकार मागण्या पूर्ण करण्यासाठी काय करणार आहे, हे ११ मुद्द्यांसह त्यात नमूद करण्यात आले होते. या आश्वासनामुळे आपण उपोषण मागे घेतले होते. सहा महिन्यांत आश्वासनांची पूर्तता नाही झाली, तर २ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचे आपण तेव्हाच सांगितले होते. पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 


२९ ऑगस्टला आलेल्या राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या पत्रामध्ये लोकपाल, लोकायुक्त अधिनियम २०१३ विषयी सरकार काय करत आहे याविषयी माहिती दिलेली आहे. मात्र, २९ मार्च रोजी मला आश्वासनांचे जे पत्र दिले होते, त्याविषयी २९ ऑगस्टच्या पत्रात काहीच लिहिलेले नाही. त्या पत्रामध्ये प्रमुख ११ मुद्दे होते, त्यावर सरकारने काय केले, याविषयी या पत्रामध्ये काहीच नाही, असेही अण्णांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्वामिनाथन आयोगाच्या अहवाला नुसार C2+50 च्या आधारावर भाव मिळावा, वयाच्या ६० वर्षानंतर ५००० रुपये पेन्शन मिळावी, शेतकऱ्यांना दूध उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळावीआदी मागण्याही हजारे यांनी पत्रात नमूद केल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...