• Home
  • News
  • Govinda debuts on YouTube after Alia Bhatt, Madhuri Dixit, channel named 'Hero No 1'

नवी सुरुवात / आलिया भट्ट, माधुरी दीक्षित यांच्यानंतर गोविंदाने केला यूट्यूबवर डेब्यू, 'हीरो नं 1' ठेवले चॅनलचे नाव

सेलिब्रिटींमध्ये यूट्यूबबरोबरच टिक-टॉकदेखील आहे विशेष लोकप्रिय

दिव्य मराठी वेब टीम

Feb 15,2020 10:59:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : हिंदी सिनेमाचा 'हीरो नं 1' म्हणजेच गोविंदाने यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आहे. नटीयूज एजन्सी आयएएनएसनुसार, अभिनेत्याने अँलूं चॅनलचे नाव ‘गोविंदा नं 1’ ठेवले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच व्हिडिओ कम्यूनिटी अ‍ॅप टिक-टॉकवर डेब्यू केला होता.


बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर असलेले गोविंदा आता यूट्यूब व्हिडिओजद्वारे फॅन्सला भेटणार आहेत. चॅनल लॉन्चच्या वेळी ते म्हणाले, 'नेहमी मी एका गोष्टीची खात्री करून घेत असतो, माझे फॅन्स ज्यांनी माझ्यावर सातत्याने प्रेम केले, त्यांचे मनोरंजन करत राहावे. यासाठी सोशल मीडियापेक्षा जास्त चांगली जागा कोणताही असू शकते.' गोविंदा शेवटचे ते मागच्यावर्षी रिलीज झालेल्या ‘रंगीला राजा’ मध्ये दिसले होते.


चित्रपट सेलिब्रिटी करत आहेत यूट्यूब डेब्यू...


गोविंदा यांच्यापूर्वी आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, जॅकलिन फर्नांडिस, कार्तिक आर्यन, अजय देवगण, माधुरी दीक्षित, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी यूट्यूब चॅनलद्वारे फॅन्सला एंटरटेन करत असतात.


सेलिब्रिटींमध्ये टिक-टॉकदेखील आहे विशेष लोकप्रिय...


यूट्यूबसोबतच पॉप्युलर व्हिडिओ अ‍ॅप टिक-टॉकवरदेखील सेलिब्रिटींची उपस्थिती मोठ्या संख्येत आहे. माधुरी दीक्षित, शाहिद कपूर, रितेश देशमुख, सनी लियोन, सिद्धार्थ मल्होत्रा, यामी गौतम, जॅकी भगनानी, कपिल शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी टिक-टॉक व्हिडिओज पोस्ट करत असतात.

X
COMMENT