आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण रिअॅलिटी शो आणि पार्टीजमध्ये त्याची उपस्थिती दिसत असते. अलीकडेच गोविंदाची काही छायाचित्रे सोशल साइट्सवर व्हायरल झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये गोविंदा पत्नी सुनीता आहुजासोबत दिसतोय. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये गोविंदा पत्नीसोबत रोमँटिक डान्स करताना दिसतोय.
गोविंदा आणि सुनीता आहुजा अलीकडेच 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी टीना आहुजा आणि संगीतकार गजेंद्र वर्माही होते. हे सर्वजण टीना आहुजाच्या आगामी 'मिलो ना तुम' या गाण्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले. यावेळी सगळे मस्तीच्या मूडमध्ये दिसले. टीना आहुजाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शोचा प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये कपिल शर्मा गोविंदा आणि सुनीता यांच्याशी गमतीशीर गप्पा मारताना दिसतोय.
या शोमध्ये पोहोचलेल्या गोविंदा आणि सुनीता यांच्या ड्रेसअपविषयी सांगायचे म्हणजे गोविंदा सूटबुटात नेहमीप्रमाणे हॅण्डसम दिसला तर त्याची पत्नीदेखील रेड कलरच्या सूटमध्ये अतिशय सुंदर दिसली. टीना गोल्डन ड्रेसमध्ये गॉर्जिअस वाटली. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये गोविंदा पत्नी सुनीताच्या भांगात कुंकू भरतानाही दिसला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.