आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Govinda Is Not Happy With The Remake Of 'kuli No. 1', Varun Dhawan And Sarah Ali Khan Will Play Lead Role

अपकमिंग : 'कुली नं. 1'च्या रिमेकमुळे आनंदी नाही गोविंदा, नवीन चित्रपटात वरून धवन आणि सारा अली खान असणार आहेत महत्वाच्या भूमिकेत 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : डेव्हिड धवन १९९५ मध्ये रिलीज झालेला आपला चित्रपट 'कुली नं. १'चा रिमेक बनवणार आहेत. मूळ चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि त्यात गोविंदाने प्रमुख भूमिका साकारली होती. या वेळी वरुणने गोविंदाची जागा घेतली आहे आणि सारा अली खान करिष्मा कपूरची भूमिका साकारत आहे. तथापि, गोविंदा या चित्रपटामुळे खुश दिसत नसल्याचे जाणवत आहे. सूत्रांच्या मते, 'गोविंदा चित्रपटाच्या रिमेकमुळे फार काही आनंदी दिसत नाही. हा त्याच्या प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक आहे. त्यामुळे याता रिमेक बनवावा, असे त्याला वाटत नाही. मात्र, त्याच्याकडे याचे अधिकार नसल्याने तो काहीच करू शकत नाही. गोविंदाला वाटते की, प्रतिष्ठित चित्रपटांचा रिमेक करू नये. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गोविंदाला 'कुली नंबर १'च्या रिमेकबाबत विचारले असता त्याने या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. गोविंदा पूर्वीप्रमाणे डेव्हिड धवनसोबत नसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.