आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माला येताच गोविंदाला सहन करावी लागली होती वडीलांची नाराजी, वडीलांनी कुशीत घ्यायलादेखील दिला होता नकार, मिळाली होती आईच्या त्या एका निर्णयाची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवुड अक्टर गोविंदा नुकतेच 55 वर्षाचे झाले आहेत. 21 डिसेंबर 1963 ला विरार, महाराष्ट्र जन्मलेल्या गोविंदाबद्दल खूप कमी लोकांना हे माहित आहे की जेव्हा त्यांचा जन्म झाला होता तेव्हा त्यांच्या वडीलांनी त्यांना मांडीवर घेण्यास देखील नकार दिला होता. हे गोविंदाने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते.  

 

काय कारण होते याचे ? चला पाहूया...
गोविंदाने या मुलाखतीत सांगितले होते, "जेव्हा मी गर्भात होतो तेव्हा आई (निर्मला देवी) साध्वी बनली होती. ती वडिलांसोबतच राहत होती. पण बिलकुल साधवीसारखे. काही महिन्यांनी माझा जन्म झाला तर वडीलांनी मला मांडीवर घ्यायलादेखील नकार दिला. त्यांना असे वाटत होते की आई माझ्यामुळे त्यांच्यापासून वेगळी होऊन साधवी बनली आहे. काही काळानंतर जेव्हा त्यांना लोकांनी माझ्याविषयी सांगितले की किती सुंदर मुलगा आहे. तेव्हा त्यांनी माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली."

 

आईची इच्छा नव्हती की मी अभिनेता बनावे.. 
गोविंदाच्या म्हणण्यानुसार त्यांची आईची कधीच इच्छा नव्हती की त्यांनी अभिनेता बनावे. मात्र वडीलांचा त्यांना पूर्ण सपोर्ट होता. गोविंदानुसार, "आईची इच्छा होती की मी बँकेत नोकरी करावी. ते तर माझे वडील होते ज्यांनी मला अक्टिंग फील्डमध्ये येण्यासाठी प्रेरित केले. ते मला म्हंटले, 'तू चांगले लिहू शकतोस, चांगला दिसतोस, अक्टिंग करु शकतो, तू चित्रपटात जायला पाहिजे. का तू जॉब शोधतो आहेस.'

 

काही काळ मी आईला न सांगता राजश्री प्रोडक्शनच्या चक्र मारत होतो. या आशेने की मला एखादे काम मिळेल. मग एक दिवस मी आईला विनंती केली तिने मला चित्रपटात जाण्याची परमिशन द्यावी. तेव्हा तिने पर्मिशनदेताना सांगितले 'नो शराब, नो सिगरेट. जर तुला प्रयत्न करायचे असतील तर तू कर. पण या गोष्टी आयुष्यात आल्या नाही पाहिजे.'

 

यानंतर मी रोशन तनेजाजीच्या एक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये गेलो. मी लकी होतो की त्यांनी माझ्याकडून फीससुद्धा नाही घेतली. सरोज खानजीने मला डान्स शिकवला, त्यासाठीही मी काही चार्ज नाही केले. फाइटर मास्टर रामने फाइट शिकवण्यासाठी कोणतीच फीस नाही घेतली. याचे कारण इतकेच होते ते माझ्या कामाने प्रभावित झाले होते."

 

21 व्या वर्षी केला डेब्यू.. 
गोविंदाने या मुलाखतीत सांगितले कि त्यांनी 21 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. चित्रपटाचे नाव होते 'हत्या' (1988). होम प्रोडक्शनच्या या चित्रपटाला त्यांचा मोठा भाऊ कीर्ति आहूजाने डायरेक्ट केले होते. येथे गोविंदाने हेदेखील सांगितले की त्यांनी 21 व्या वर्षी 50 दिवसांच्या आत 49 चित्रपट साइन केले होते. गोविंदा 6 भाऊ-बहिणींमध्ये सर्वात लहान आहेत. 

 

पाकिस्तानशी आहे घनिष्ट नाते.. 
खूप कमी लोकांना आमची आहे की, गोविंदाचे पाकिस्तानशी घनिष्ट नाते आहे. त्यांचे वडील अरुण आहूजा यांचा जन्म गुजरानवाला (ब्रिटिश शासनाच्या काळात), पाकिस्तानमध्ये झाला. अरुण तेथून मुंबईत आले आणि 1940 मध्ये महबूब खानचा 'औरत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. ते एक सक्सेसफुल अक्टर झाले. कार्टर रोडवर त्यांचा एक सुंदर बंगलादेखील आहे. गोविंदाने सांगितले, त्यांच्या वडीलांनी एक चित्रपट प्रोड्यूस केला होता ज्याने खूप नुकसान केले. फायनली, त्यांना बंगला विकून विरारमध्ये शिफ्ट व्हावे लागले. 

 

पुढील स्लाईडवर पहा गोविंदाचे काही रेअर फोटोज...

बातम्या आणखी आहेत...