आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदाला धक्के देऊन बाहेर काढत होते डायरेक्टर, अभिनेत्याने स्वतः ऐकवली तेव्हाची आणि आताची कहाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. बॉलिवूडचा मोठा अभिनेता गोविंदाच्या सुरुवातीच्या दिवसांची आणि सध्याच्या दिवसांची तुलना केल्यावर कळते की, त्यांच्या आयुष्याने त्याला पुन्हा त्याच ठिकाणी आणले आहे. एकेकाळी डायरेक्टर गोविंदाला धक्के देऊन काढून टाकायचे आणि आजच्या काळातही त्याला त्याच्या चित्रपटाच्या रिलीजसाठी तरसावे लागत आहे. पण मधल्या काळात गोविंदाने अनेक हिट चित्रपट दिले आहे. एका एन्टटेन्मेंट पोर्टलसोबत बोलताना गोविंदा म्हणाला की, "जेव्हा मी स्ट्रगल करत होतो, तेव्हा सर्व प्रोड्यूसर-डायरेक्टरला अप्रोच करायचो. अनेक वेळा मला मोठे-मोठे डायरेक्टर धक्के देऊन बाहेर काढायचे. लोकांनी मला बाहेर काढल्यावर मी त्यांना खुप भांडायचो."

 

आज पुन्हा स्ट्रगल करत आहे गोविंदा 
गोविंदाने त्याच्या स्ट्रगलची कथा सांगितली आहे. तर दूसरीकडे काही दिवसांपुर्वी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये त्याच्या वेदना दिसल्या. गोविंदा म्हणाला - मी एवढ्या मेहनतीने काम केले, पण आज इंडस्ट्रीत माझा एकही चित्रपट रिलीज दिला जात नाही. तो म्हणाला की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याच्यासोबत गेल्या 9 वर्षांपासून काही तरी प्लान केला जात आहे. त्याने कुणाचेही नाव घेतले नाही. सध्या गोविंदाच्या 'रंगीला राजा' चित्रपटाच्या रिलीजमध्ये अडचणी येत आहेत. गोविंदाचा हा चित्रपट 8 नोव्हेंबरला रिलीज होणार होता, पण सेन्सॉर बोर्डाने यावर 20 कट लावण्यास सांगितले आहे. यामुळे हा चित्रपट रिलीज झालेला नाही. विशेष म्हणजे या काळात अमिताभ बच्चन आणि आमिर खानचा 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तान' रिलीज झाला. या चित्रपटात गोविंदासोबत शक्ती कपूर आहे. चित्रपटाचे डायरेक्टर पहलाज निहलानी आहेत. नुकत्याच एका कॉन्फ्रेंसमध्ये गोविंदा म्हणाला की, त्याच्याविरुध्द काही लोक प्लान करत आहेत. तो म्हणाला की, माझा चित्रपट खराब आहे की चांगला याचा निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. प्रेक्षकांनी हा निर्णय घ्यावा यासाठी हा चित्रपट रिलीज होणे गरजेचे आहे. पण काही लोकांना वाटते की, माझ्या चित्रपटाला थिएटर मिळू नये. रंगीला राजाची नवीन रिलीज डेट 7 डिसेंबर आहे.


आता आयुष्य एन्जॉय करण्याची इच्छा 
गोविंदाने मुलाखती दरम्यान सांगितले की, "मी कधीच माझे स्टारडम एन्जॉय करु शकलो नाही. कधीच ड्रिंक्स घेतले नाही, फिरलो नाही आणि आयुष्यात ऐश केली नाही. कारण माझ्यावर अनेक कौटूबिंक जबाबदा-या होत्या. माझी आई साधु होती तर माझे मन नेहमीच पूजेत लागत होते. आता मला आयुष्य एन्जॉय करावे वाटतेय पण तारुण्य परत येत नाही. आईसोबत राहून मी मम्माज बॉय बनून राहिलो होतो. जे काम मी तारुण्यात करु शकलो नाही, ते मला आता करायचे आहे. मग मला लोक काय म्हणतील याचा विचार येतो."

 

काही चांगले लोकही मिळाले 
गोविंदा म्हणाला - स्ट्रगलिंग डेजदरम्यान काही चांगले लोकही मिळाले. एक बंगाली भाऊ मला जेवण द्यायचे आणि पैसेही घ्यायचे नाहीत. डान्स मास्टर-फाइट मास्टरही माझ्याकडून पैसे घेत नव्हते. ही सर्व देवाची कृपा होती. 
- 'मी कधीच कुणासोबत वाईट वागलो नाही. स्पॉट बॉयसोबतही कधी मोठ्या आवाजात बोललो नाही.'

बातम्या आणखी आहेत...