अलका याज्ञिकच्या मुलीच्या / अलका याज्ञिकच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले अनेक सिंगर्स, कुमार सानू-सोनू निगम आणि हिमेश रेशमिया पोहोचले पत्नीसोबत, गोविंदानेही दिल्या शुभेच्छा : Video

गायन किंवा अभिनय नव्हे तर या क्षेत्रात नाव कमवत आहे मुलगी... 

Dec 24,2018 11:21:00 AM IST

मुंबईः नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिकची मुलगी सायशा कपूरचे 22 डिसेंबर रोजी मुंबईत वेडिंग रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनला बॉलिवूडच्या अनेक नावाजलेल्या गायक आणि अभिनेत्यांनी उपस्थिती लावून सायशाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कुमार सानू, सोनू निगम, कविता कृष्णमूर्ती, सुरेश वाडकर, ईला अरुण, अनूप जलोटा आणि हिमेश रेशमियासह अनेक नावाजलेले गायक रिसेप्शन पार्टीत सहभागी झाले होते. याशिवाय अभिनेता गोविंदा पत्नी सुनीतासोबत पोहोचला. जॉनी लिव्हर, जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनीही नवविवाहित दाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले.


12 डिसेंबर रोजी सायशाने बॉयफ्रेंडसोबत थाटले लग्न...
अलका याज्ञिकची एकुलती एक मुलगी सायशाने 12 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड अमित देसाईसोबत लग्न केले. लग्नात सायशाने रेड कलरचा लहेंगा परिधान केला होता. तर अमित आयवरी शेरवानीत दिसला होता. खास गोष्ट म्हणजे मुलीच्या लग्नात अलका याज्ञिकने परफॉर्मन्स दिला होता. अलकाने सायशाला एक इमोशनल साँग डेडिकेट केले होते. गेल्यावर्षी म्हणजे 25 डिसेंबर 2017 रोजी सायशा आणि अमितचा साखरपुडा झाला होता.


सायशाने गायन क्षेत्रात बनवले नाही करिअर...
- 28 वर्षीय सायशा अंधेरी स्थित Boveda Bristro या रेस्तराँची को-ओनर आहे.
- हे रेस्तराँ ती तिच्या एका बालपणीच्या मित्रासोबत चालवते.
- सायशाने लंडन स्कूल ऑफ मार्केटिंगमधून एमबीए पू्र्ण केले आहे. अनेक हॉटेल मॅनेजमेंट कंपनीसोबत सायशा जुळली आहे.
- ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंध असूनदेखील सायशाने या इंडस्ट्रीत करिअर बनवले नाही.
- खरं तर सायशाने फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता, पण हे विश्व आपल्यासाठी नाही, हे लवकरच तिच्या लक्षात आले आणि तिने ही इंडस्ट्री सोडून हॉटेल इंडस्ट्रीत करिअर करण्याचा निर्णय घेतला.
- विशेष म्हणजे सायशाने आईच्या पावलावर पाऊल ठेवत गायनाचे शिक्षण घेतले आहे. पण ती गायनात फारशी रमत नाही.
- अलका याज्ञिक यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, त्यांनी त्यांच्या मुलीला हव्या त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केले होते.

26 वर्षांपासून वेगळे राहात आहेत अलका आणि तिचे पती नीरज...
- अलका याज्ञिक आणि शिलाँग बेस्ड बिझनेसमन नीरज कपूर यांच्यासोबत 1989 मध्ये लग्न केले होते.
- लग्नानंतर कामाच्या निमित्ताने अलका सर्वाधिक काळ मुंबईत वास्तव्याला असायची. तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे.
- अलका याज्ञिक कामातून जसा वेळ मिळेल तशी शिलाँग जात असे, तर कधी कधी नीरज मुंबईत येत असतं.
- दीर्घकाळ असाच क्रम सुरु होता. याचकाळात त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. अलका आणि नीरज हे दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांनी वेगळे राहून कामावर लक्ष केंद्रित केले. एवढी वर्षे वेगळी राहूनदेखील त्यांच्यातील प्रेम, बाँडिंग मात्र कायम आहे.

X