आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Govt Has Nothing To Sell, Thats Why They Are Selling Forts, Says Prakash Ambedkar

'आता काहीच विकालया शिल्लक राहीलं नाही म्हणून सरकारने किल्ले विकायला काढले'- प्रकाश आंबेडकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे विवाहस्थळ आणि हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. हेरिटेज टुरिझमला एमटीडीसीने राज्यातील 25 ऐतिहासिक गड किल्ल्यांची निवड केली होती. राज्यातील किल्ल्यांचे जतन होण्याऐवजी त्यांचे हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये रूपांतरण करणे दुर्दैवी असल्याचे म्हणत, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारकडे आता काहीच विकालया नाहीये, म्हणून त्यांनी गड किल्ले विकायला काढले असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
"सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाने राज्य विकले आहे, आता त्यांच्याकडे विकण्यासाठी काहीच शिल्लक राहीले नसल्याने त्यांनी महाराजांचे किल्ले विकायला घेतले आहेत. महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी पराक्रम करुन महान इतिहास जगासमोर मांडला, जाती व्यवस्तेविरुद्ध मोठी चळवळ निर्माण केली. अशा ऐतिहासीक किल्याचा वारसा टिकवण्याऐवजी, याचा इतिहास मिटवून या ठिकाणी रमनीय स्थळे निर्माण केली जाणार आहेत. यापेक्षा राज्याचे दुर्दैव काहीच नाही. या सरकार इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जनतेने या भाजपलाच मिटवावे असे आव्हान मी करतो.'' अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

काय म्हणाले होते फडणवीस
पण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. "छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांना नख सुद्धा लागू देणार नाही. गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या किल्ल्यांना कोणताही इतिहास नाही, अशा किल्ल्यांबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील 25 गडकिल्ले भाड्याने देण्याच्या वृत्तावर खुलासा करताना ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठयांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांसादर्भात कोणत्याही गोष्टींची परवानगी शासनाने दिलेली नाही, असं फडणवीस म्हणाले. ज्या किल्ल्यांना कोणताच इतिहास नाही. ज्यांच्या केवळ चार भिंतीच उरल्या आहेत. अशा किल्ल्यांचा पर्यटनादृष्टीने विचार करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा किल्ल्यांवरही लग्न किंवा इतर कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही. या निर्णयाबाबत चुकीचे वृत्त पसरवले जात असल्याचेही ते म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...